25 February 2021

News Flash

शाहरुखच्या बंगल्याला आयकर विभागाने ठोकले टाळे

शेतीसाठी विकत घेतलेल्या जमिनीवर बंगला बांधल्याचा शाहरुखवर आरोप

शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्याला आयकर विभागाने टाळे ठोकले आहे. मात्र हा बंगला मुंबईतला मन्नत नाही तर अलिबाग येथील आहे. शेतीसाठी विकत घेतलेल्या जमिनीवर शाहरुखने त्याचा आलिशान बंगला उभारला आहे. १९ हजार ९६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा बंगला बांधण्यात आला आहे. यासंदर्भात शाहरुखला आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. ९० दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास मालमत्ता जप्त होते. हाच नियम पुढे करत अलिबाग येथील बंगल्याला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या बातमीनुसार शाहरुखचा हा बंगला म्हणजे १४६.७ कोटींची ही मालमत्ता असून त्याचे बाजारमूल्य पाच पटीने वाढण्याची शक्यता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पाच बंगल्यांना जेवढी जागा लागते तेवढ्या जागेत शाहरुखचा हा एक बंगला उभा राहिला आहे. या बंगल्यात त्याचे हेलिपॅड आणि स्विमिंग पुलही आहे.

शाहरुखने मोठा बंगला बांधण्यासाठी तो शेतकरी असल्याचे दाखवून जमीन विकत घेतल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, शाहरुखने २००५-०६ देजा वू कंपनीला ८.४ कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज दिले होते. या संपूर्ण प्रकरणावर शाहरुखने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 6:41 pm

Web Title: income tax department attaches shah rukh khan alibaug farmhouse
Next Stories
1 PadMan curtain raiser: मासिक पाळी आली अन्, ‘लडकी सयानी हो गई’
2 फरहानच्या ‘त्या’ फोटोमागचं व्हायरल सत्य
3 …म्हणून ‘पद्मावत’च्या सेटवर शाहिद पडला एकटा
Just Now!
X