29 September 2020

News Flash

वेळेत कर्जफेड करून पत वाढवा – अण्णा हजारे

बँकिंग व्यवस्था ही देशाच्या आर्थिक  विकासाची नाडी आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून स्वत:ची पत राखावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांनी केले.

भारतीय स्टेट बँकेचे नगरचे क्षेत्रीय कार्यालय तसेच पारनेर शाखेच्या वतीने तालुक्यातील ग्राहकांच्या चावडी मेळाव्याचे नुकतेच हजारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत  होते.

हजारे म्हणाले, बँकिंग व्यवस्था ही देशाच्या आर्थिक  विकासाची नाडी आहे.  बँकिंगच्या माध्यमातून  देशाचा विकास साधणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राष्ट्रीयीकृत बँका तसेच शासनाच्या विविध योजना तसेच कर्जाचा लाभ घेऊन राळेगणसिद्धीने देशात आदर्श निर्माण केला.

राळेगणसिद्धीप्रमाणे राज्यातील प्रत्येक  गावाचा विकास झाला तर आपला देश सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. राळेगणप्रमाणे बँकांच्या तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांनी राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद करतानाच प्रत्येकाने आनंदाच्या मागे न धावता नि:स्वार्थ भावनेने कार्य केल्यास निश्?िचत आनंदप्राप्त होईल असे ते म्हणाले.

बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक  सुमध चव्हाण यांनी चावडी मेळाव्याची संकल्पना स्पष्ट करून अण्णांनी घडविलेल्या राळेगणसिद्धीप्रमाणे स्टेट बँक घडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजना, विमा  योजना, पेन्शन योजना यांची माहिती देत ग्राहकांनी बँकेशी असलेले सबंध जपण्याचे अवाहन केले.

यावेळी पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, मुख्य प्रबंधक  मोहिते, शाखाधिकारी शेवाळे  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. निघोज शाखेचे  शाखाधिकारी अव्देत चोथवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 2:06 am

Web Title: increase creditworthiness over time anna hazare abn 97
Next Stories
1 एसटी बस- गाडीच्या अपघातात ३ ठार, ९ जखमी
2 सहलीसाठी पैसे न दिल्याने १९ वर्षीय युवकाची आत्महत्या
3 परभणीतील पाच पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे पुन्हा वर्चस्व
Just Now!
X