News Flash

पालघर जिल्ह्यात मतदारांत वाढ

बोईसर व नालासोपारा या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदार वाढीचा दर लक्षणीय राहिला आहे.

|| नीरज राऊत

२० लाखांचा टप्पा ओलांडला; सव्वा वर्षांत ९२ हजार नवीन मतदार

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदार संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला असून गेल्या सव्वा वर्षांत मतदारांची वाढ ९२ हजारपेक्षा अधिक झाली आहे. बोईसर व नालासोपारा या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदार वाढीचा दर लक्षणीय राहिला आहे. डहाणू विधानसभा क्षेत्रातील मतदार संख्येमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.

सण २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील एकुण मतदार संख्या १९ लाख ५१ हजार ६६८ इतकी नोंदवण्यात आली होती. १५ जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या अंतिम मतदार यादीत मतदार संख्या संख्या २० लाख ४४ हजार २८९ इतकी झाली असून त्यामध्ये दहा लाख ७५ हजार ८४५ पुरुष मतदार, नऊ लाख ६८ हजार ३२६ महिला मतदान व ११८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये नालासोपारा विधानसभा क्षेत्रात ४० हजार ७६३ तर बोईसर विधानसभा क्षेत्रात ३८ हजार ६२ मतदारांची वाढ झाली आहे.

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२० या कालावधीत ३८ हजार ६८४ नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ३३ हजार ५७९ नाव यादीत समाविष्ट करण्यात आले असून त्यापैकी आठ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. या कार्यक्रमात २००१ मयत, १७६८ स्थलांतरित तसेच ३६४८ दुबार असे एकंदर सात हजार ४१७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात असलेल्या एकूण मतदारांपैकी नऊ हजार २५४ अपंग मतदार असून ९४.५९ टक्के मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एक हजार पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ९०० इतकी असून नालासोपारामधील महिला मतदारांचे प्रमाण सर्वात कमी आहे.

मतदार वाढीचे प्रमाण लक्षणीय

पालघर जिल्ह्यात विशेषत: नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदार वाढीचे प्रमाण हा गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०१९ च्या कालावधीत पालघर लोकसभा क्षेत्रात ५० हजार ८३३ मतदारांची वाढ झाली होती तर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत १५ हजार ५३८ मतदार संख्या वाढल्याचे दिसून आले होते. त्यापूर्वी एप्रिल २०१४ एप्रिल २०१९ या कालावधीत ७२ हजार ३१४ मतदार संख्या वाढली होती. संपूर्ण मतदार संघ करोना संक्रमणाच्या प्रभावाखाली असताना गेल्या सव्वा वर्षात पालघर लोकसभा मतदार संघात झालेली मतदार संख्येतील वाढ ही सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील वाढीपेक्षा अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2021 12:36 am

Web Title: increase in the number of voters in palghar district akp 94
Next Stories
1 चारोटी टोल नाक्यावर अपघात, १४ जखमी
2 श्वानाने कोंबड्या खाल्ल्याने वृद्धाची आत्महत्या
3 राम मंदिरासाठी खंडणीचा आरोप
Just Now!
X