भारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापनदिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मदान येथे पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा न्यायाधीश सेवलीकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी यांनी पोलिसांची मानवंदना स्विकारली, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या आपली जिल्हा पुस्तिकेचे यावेळी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये चांगले यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी गौरव केला.

सन्मानित करण्यात आलेल्या गुणवंतांची व खेळाडूंची नावे :

  • गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता पुरस्कार २०१६-१७ सुरेश हरीभाऊ गावंड-खेळ-शुटींगबॉल.
  • गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-२०१६-१७ लक्ष्मण नारायण गावंड,
  • गुणवंत खेळाडू पुरस्कार-२०१६-१७ कु.मेघा अनंत परदेशी (महिला),
  • गुणवंत खेळाडू पुरस्कार-२०१६-१७ कु.सागर रिवद्र वैद्य (पुरुष),
  • जिल्हा युवा पुरस्कार २०१५-१६-अशिष विश्वनाथ लाड (युवक), रा.दहिवली,ता.कर्जत.
  • प्रणिता नंदकुमार गोंधळी (युवती), रा.चेंढरे, ता.अलिबाग.
  • जिल्हा युवा पुरस्कार संस्था महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, पाणदिवे, पो.कोप्रोली,ता.उरण.

महाडमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा                                                     

भारतीय स्वातंत्र्यदिन महाडमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शासकिय ध्वजारोहण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस  निरिक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मानवंदना दिली .यावेळी तहसिलदार चंद्रसेन पवार, शहर पोलीस ठाण्याचे पो .नि . रिवद्र िशदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो.नि. आबासाहेब पाटील आदी शासकिय अधिकारी, राजकिय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकत्रे महाडकर नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महाड नगर परिषदेत नगराध्यक्षा स्न्ोहल जगताप, तर पंचायत समितीत सभापती सिताराम कदम यांनी ध्वजवंदन केले. महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागातही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.