03 June 2020

News Flash

राज्यातील ४१ पोलिसांना राष्ट्रपती पदक

अतिरिक्त पोलीस आयुक्त के एम मल्लिकार्जून प्रसन्न यांना पदक

प्रतिकात्मक छायाचित्र

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील ४१ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राष्ट्रपतीपदासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के एम मल्लिकार्जुन प्रसन्न, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, लाचलुचपत विभागाचे विशेष महानिरीक्षक केशव पाटील यांचा पदकवीर पोलिसांमध्ये समावेश आहे.

उल्लेखनीय सेवेसाठी सोमवारी राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. पदकवीर पोलिसांची यादी खालील प्रमाणे:
मुंबईतील अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रतापसिंह पाटणकर ( विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर विभाग), केशव पाटील ( विशेष महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अंकुश शिंदे (अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर शहर), बळशीराम गायकर (पोलीस उपायुक्त, पुणे शहर), डॉ. प्रभाकर बुधावंत (पोलीस अधीक्षक, पुणे), अनिल कुंभारे (पोलीस उपायुक्त, मुंबई), महेश घुर्ये ( कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल), दिलीप सावंत (पोलीस उपायुक्त, सीआयडी, मुंबई), राजेंद्र डहाळे (पोलीस अधीक्षक, नंदुरबार), निसार तांबोळी (कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल- औरंगाबाद), अनिल आकडे (पोलीस उपअधीक्षक, वसई), नागनाथ कोदे (सहाय्यक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर), जयराम मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई), सर्जेराव पाटील (पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण), सुधीर कालेकर (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-१, मुंबई), विनायक वस्त (पोलीस निरीक्षक, सीआयडी, खंडणीविरोधी पथक, मुंबई), सुभाष सावंत (पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई), विवेक मुगलीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे, पुणे), मधुकर कड (पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक), बजरंग कापसे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर), प्रकाश पोतदार (पोलीस उपनिरीक्षक, सिंदखेड, धुळे), विजय टक्के (पोलीस उपनिरीक्षक,एसआयडी, मुंबई), रामचंद्र कानडे (पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी युनिट १२, दहीसर), दिलीप रतन माळी (पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे), सुनील चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफएस, सोलापूर), राजकुमार माने (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर, पुणे), कैलास शंकर मोहोळ (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड, पुणे), प्रकाश नाईक (सहाय्यक पोलीस निरीक्षक, एसआरपीएफ, पुणे), रौफ शेख (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर), मोजोद्दीन कदार शेख (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपतविरोधी पथक, जळगाव), सदाशिव शिंदे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, पुणे), मदन गीते (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जालना), लक्ष्मण गायकवाड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी युनिट-६, मुंबई), सुरेश जगताप (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग, पुणे), नंदकिशोर परदेशी (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, जालना), धनराज चव्हाण (हेड कॉन्स्टेबल, जळगाव), रघुनाथ शामराव फुके (औरंगाबाद), राम बागम (हेड कॉन्स्टेबल, मुंबई), प्रकाश लांघे (हेड कॉन्स्टेबल, पुणे शहर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 5:14 pm

Web Title: independence day 2017 police medal for meritorious service maharashtra k m mallikarjun prasanna keshav patil
टॅग Maharashtra
Next Stories
1 शहीद सुमेध गवई यांना अखेरचा सलाम; मूळगावी लष्करी इतमामात झाले अंत्यसंस्कार
2 राज्य सरकारमध्ये अनागोंदी कारभार
3 अबुजमाड जंगलातील नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त
Just Now!
X