नागपूर : भारताने निर्धारित वेळेच्या आत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य पूर्ण केल्याची नोंद गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डने घेतली आहे. व्याघ्र संवर्धनासाठी के लेले प्रयत्न व गणनेसाठीची अत्याधुनिक पद्धती याबद्दल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचाही विशेष उल्लेख यात करण्यात आला आहे.

भारतातील संरक्षित क्षेत्रात १४१ विविध ठिकाणांवरील सुमारे २६ हजार ८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. या कॅ मेरा ट्रॅपमध्ये  गतिमान सेन्सर्स आणि छायाचित्र घेणारे उपकरण  आहे. कोणताही प्राणी त्या परिसरातून गेल्यास ही यंत्रणा आपोआप सुरू होते.

कॅ मेरा ट्रॅपच्या माध्यमातून सुमारे १ लाख २१ हजार ३३७ चौरस किलोमीटरमधील परिणामकारक क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या कॅ मेरा ट्रॅपमधून ३ कोटी ४८ लाख ५८ हजार ६२३ वन्यजीवांची छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांमध्ये ७६ हजार ६५१ वाघांची तर ५१ हजार ७७७ बिबटय़ांची छायाचित्रे होती. उर्वरित इतर प्राण्यांची छायाचित्रे देखील या कॅ मेरा ट्रॅपने टिपली. ‘स्ट्रीप पॅटर्न सॉफ्टवेअरच्या’ माध्यमातून २ हजार ४६१ वाघांची ओळख पटवण्यात आली. यात वाघांच्या बछडय़ांचा समावेश नव्हता. पायी सर्वेक्षणाच्या माध्यमातूनही वाघांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. ५ लाख २२ हजार ९९६ किलोमीटर क्षेत्रावर पायी सर्वेक्षण करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासोबतच भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून ही संपूर्ण प्रक्रि या पार पाडली. यात राज्यांचे वनखाते आणि अन्य संस्थांनी सहकार्य के ले.

वर्षांगणिक स्थिती

२००६ मध्ये १४११

२०१० मध्ये १७०६

२०१४ मध्ये २२२६

२०१८ मध्ये २९६७