बुधवारी, ९ मार्चला होणारे खग्रास सूर्यग्रहण हे भारतातून खंडग्रास दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय वेळेनुसार २३.१९ वाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि १.५९ वाजता खग्रास स्थिती असेल. भारतातून सूर्योदयापूर्वीच ग्रहण लागलेले असेल आणि सूर्योदयापासून ५.४५ ते ७.२७ वाजेपर्यंत १ तास ४२ मिनिटे हे आंशिक ग्रहण दिसेल, अशी माहिती स्काय वाच ग्रुप, इंडियातर्फे देण्यात आली आहे. या ग्रहणाच्या वेळी चंद्राचा आकार मोठा असल्याने हे ‘सुपरमून सुर्यग्रहण’ असेल.

हे ग्रहण उत्तर गोलार्धातील सुमात्रा, बोर्नेओ, इंडोनेशिया, उत्तरीय सुलावेशी आणि पॅसिफिक-आशिया या भागातून खग्रास स्थितीत दिसले. आंतरराष्ट्रीय वेळेप्रमाणे हे ग्रहण ८ मार्चला २३.१९ वाजता इंडोनेशिया येथून सुरू होईल. खग्रास स्थिती ४.९ मिनिटाची असेल आणि पॅसिफिक-ओशिया येथे हे ग्रहण संपेल. या ग्रहणाचे वेळी चंद्राचा आकार मोठा असल्याने हे ‘सुपरमून सुर्यग्रहण’ असेल. सुर्यग्रहणाच्या वेळी सूर्य व पृथ्वी यांचे मध्ये चंद्र येतो. चंद्राची गडद छाया पृथ्वीवर जेथे पडते जेथे सूर्य पूर्ण झाकलेला दिसतो. तेथे खग्रास ग्रहण आणि जेथे उपछाया पडते तेथे सूर्य पूर्ण झाकला दिसत नाही. तेथून आंशिक किंवा खंडग्रास सूर्यग्रहण होते. भारतातून हे ग्रहण सूर्योदयापासून म्हणजे ५.४५ ते ७.२७ वाजेपर्यंत १ तास ४२ मिनिटे खंडग्रास दिसेल. सूर्य ११ ते १५ टक्के ग्रासलेला दिसेल.

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

पूर्व भारतातील अगरतला, भूवनेश्वर, गुवाहाटी, कोलकाता, पाटणा, पोर्टब्लेअर, नागपूर येथून हे ग्रहण आंशिक दिसेल. पूर्व व मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणाहून हे आंशिक ग्राहण सकाळी ६.०३ ते ७.३९ दरम्यान पाहता येईल. मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून हे ग्रहण दिसणार नाही. विदर्भातून सकाळी सुर्योदयासोबतच हे आंशिक ग्रहण पाहता येईल. ग्रहण साध्या डोळ्याने पाहू नये, जाड वेल्डिंग ग्लास, काळी एक्स्पोज केलेली एक्स-रे फिल्म, ग्रहण चष्मा, किंवा जाड काजळीतूनच ग्रहण पहावे, कुठलीही अंधश्रध्दा न मानता खगोलीय घटनेचा खगोल व विज्ञानप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन येथील खगोल अभ्यासक व स्काय वॉच ग्रुप इंडियाचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी केले आहे.