18 January 2021

News Flash

महाबळेश्वर येथे विहिरीत गवा पडला ; बचाव कार्य सुरु

जंगलातून गवा लिंगमळा येथील वेण्णा नदीत पाणी पिण्यासाठी आला होता.

महाबळेश्वर ट्रेकर्स जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने या गव्याची शिंगाने बांधून तो पाण्यावर तरंगेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे

वाई:महाबळेश्वर येथील ग्रीन वूड सोसायटी मधील विहिरीत सायंकाळी गवा पडला .जंगलातून गवा लिंगमळा येथील वेण्णा नदीत पाणी पिण्यासाठी आला होता.पाणी पिऊन परत जात असताना महाबळेश्वर वाई रस्त्यावर एका मोटारीला धडकून पळत असताना ग्रीन वुड सोसायटीत घुसला. ग्रीन वुड सोसायटी मधील संरक्षक भिंतीमुळे त्याला बाहेर पडता येत नव्हते.

गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही रस्ता सापडत नसल्यामुळे विहीरीच्या अवतीभवती तो फिरत राहीला बघताक्षणी तो सोसायटीच्या आवारात फिरताना वीस फूट खोल विहिरीत पडला.हा गवा एक टन वजनाचा असल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने प्रयत्न सुरु आहेत.महाबळेश्वर ट्रेकर्स जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने या गव्याची शिंगाने बांधून तो पाण्यावर तरंगेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.कोल्हापूर येथून आपत्कालीन व्यवस्था पाहणारी तद्नांची टीम पाचारण करण्यात आली आहे

वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी आहेत.गव्याला विहरी बाहेर काढण्यासाठी मोठी क्रेन बोलाविण्यात आली आहे.बचाव कार्यास सुरूवात घटनास्थळी पोलिस वनविभाग महाबळेश्वर ट्रेकर्स दाखल झाले आहेत.ट्रेकर्स टीम कडून विहीरीवरील लोखंड जाळी कापून विहीरीवरील भाग मोकळा करण्यात येत आहे सायंकाळी अंधार असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या बचावकार्यात वनविभागाच्या कर्मचार्यांसह महाबळेश्वर ट्रेर्कसचे सुनिल भाटिया नगरसेवक कुमार शिंदे अनिल केळगणे निलेश बावळेकर प्रशांत आखाडे संजय शिंदे देवेंद्र चौरसिया संदेश भिसे यांच्यासह अनिल भिलारे अंकुश बावळेकर आदी सक्रीय आहेत रानगव्याला पाहण्यासाठी विहीर परिसरात मोठी गर्दी झाली आहे. मात्र पोलीस व वनविभागाने मुख्य प्रवेशद्वार बंद केले रात्री उशीरापर्यत हे बचावकार्य सूरु आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 10:50 pm

Web Title: indian bison fall in wall at mahabaleshwar rescue work start zws 70
Next Stories
1 राज्यात आज ३,५५८ नव्या करोनाबाधितांची नोंद
2 क्रिकेट खेळताना झाला वाद; डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
3 सुरक्षेत कपात केल्याचं स्वागत, पण…; चंद्रकांत पाटलांनी सरकारला दिला सल्ला
Just Now!
X