News Flash

उपनगरीय रेल्वे डबे आता ‘मेड इन लातूर’, ३० लाख लोकांना मिळणार रोजगार

अप्रत्यक्षरित्या सुमारे ३० लाख लोकांना रोजगार मिळेल

संग्रहित छायाचित्र

लातूरमध्ये उपनगरीय रेल्वे सेवेतील डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास मराठवाड्यात तब्बल ३० लाख लोकांना रोजगार मिळेल, असा रेल्वे मंत्रालयाचा अंदाज आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपनगरीय रेल्वे डब्यांची लातूरमध्ये निर्मिती केली जाणार आहे. यासाठी लातूरमध्ये कोच फॅक्टरी उभारण्यात येईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील विकासकामांना गति मिळेल. लातूरमधील डब्यांच्या निर्मितीच्या कारखान्यामुळे (कोच फॅक्टरी) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे ३० लाख लोकांना रोजगार मिळेल. पियूष गोयल यांनी रेल्वेच्या महाराष्ट्रातील कामांचा पाढाही वाचून दाखवला. मुंबई आणि परिसरातील कामांमुळे ५० लाख नोकऱ्या निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात ठिकठिकाणी रेल्वे रुळ मार्गाचे नुतनीकरणाचे कामही सुरु आहे. राज्यात हायस्पीड ट्रेनमुळे रोजगार आणि विकास कामात हातभार लागेल, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे आभार मानलेत.

दरम्यान, गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुंबईतील लोकल सेवेसाठीही भरघोस निधी मिळाला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सुमारे ५१ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सीएसएमटी-पनवेलदरम्यान जलद रेल्वेमार्ग उभारण्यासोबतच पनवेल-विरार प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी अर्थमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. त्यासोबतच हार्बरचा बोरिवलीपर्यंतचा विस्तार, २१० वातानुकूलित लोकलगाडय़ा, सर्व स्थानकांत वायफाय व सीसीटीव्ही, सरकते जिने अशा पूर्वघोषित प्रकल्पांच्या पूर्ततेला या निधीद्वारे वेग येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 11:25 am

Web Title: indian railway will set up rail coach factory in latur railway minister piyush goyal will create job in marathwada
Next Stories
1 पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘सीडीएस’ परीक्षेत देशात पहिली
2 मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेची झाली कासवछाप अगरबत्ती: शिवसेना
3 नरेंद्र मोदींनी बहुमत वाया घालवले
Just Now!
X