29 October 2020

News Flash

इंदुरीकर महाराजांकडून आता शिक्षकांची खिल्ली, शिक्षक संघटना नाराज

शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.

चार दिवसांपूर्वीच त्यांच्या किर्तनातलं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं. ओझरमध्ये झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केल होतं. त्या पाठोपाठ आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे.

शिक्षकांबाबत काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
शिक्षक ३५ मिनिटांच्या तासिकेत पाच मिनिटं तर शिक्षक वर्गात जाण्यासाठी घालवतात. त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं घालवतात. आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला आणखी पाच मिनिटं घेतात. उरलेल्या वेळात उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. त्यानंतर काय मग तास संपला हे सांगायचीच वेळ येते. असं म्हणत शिक्षक त्यांना शिकवण्याची तासिका आटोपती घेतात असंही इंदुरीकर महाराज या क्लिपमध्ये सांगत आहेत.

इंदुरीकर महाराज यांची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांची नोकरी कशी आरामदायी आहे हे इंदुरीकर महाराज सांगू पाहात आहेत मात्र त्यांनी ते स्वतः शिक्षक आहेत हे विसरु नये असं काही शिक्षकांनी सुचवलं आहे. तर इंदुरीकर महाराज हे स्वतः शिक्षक आहेत त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलीन करु नये असंही काही शिक्षकांनी सुचवलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

किर्तनातून प्रबोधन केलं जाण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. या किर्तनात काही वेळा विडंबनही केलं जातं. उपहासात्मक भाष्यही केलं जातं. महाराष्ट्राला हे सगळे प्रकार ज्ञात आहेत. त्यामध्ये किर्तनकारांचा हेतू हा प्रबोधनाचा असतो हेदेखील महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र अशा प्रकारे शिक्षकांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी आहे असे मत अॅक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शिक्षकांवर अशा प्रकारे भाष्य करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 7:10 am

Web Title: indurikar maharaj kirtan clip viral again now teachers union upset on his statement scj 81
Next Stories
1 सोलापूरच्या सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करा
2 राज्यातील सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्था घसरणीला
3 विदर्भातून विधान परिषदेसाठी कुणाला संधी?
Just Now!
X