19 September 2020

News Flash

….तर कीर्तन सोडून शेती करेन- इंदुरीकर महाराज

पुत्रप्राप्तीबाबतच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराज यांची प्रतिक्रिया समोर

पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला किर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे चांगलेच अडचणीत आले आहेत. मात्र गेले चार दिवस प्रचंड मनस्ताप झाला आहे. दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं असं स्पष्टीकरण देत हे सगळं थांबलं नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी हताश प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली आहे. बीडमधल्या परळी या ठिकाणी झालेल्या किर्तनात त्यांनी हे स्पष्ट केलं.

पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते काही ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. मात्र जो काही वाद झाला त्यामुळे मला खूप त्रास झाला, मी उद्विग्न झालो आहे. दोन दिवसात माझं वजनही कमी झालं आहे. आता एक-दोन दिवस वाट पाहिन. वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?
चार दिवसांपूर्वी अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज यांनी त्यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं. . हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला. तसंच त्यांना या प्रकरणी नोटीसही बजावली.

या सगळ्या प्रकारानंतर इंदुरीकर महाराजांची उद्विग्न प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या चार दिवसात मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. जर हे थांबलं नाही तर मी कीर्तन सोडून शेती करेन अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 2:11 pm

Web Title: indurikar maharaj reaction on his controversial statement on girl and boy child scj 81
Next Stories
1 Video : व्हॅलेंटाईन डे निमित्त अमृता फडणवीसांनी गायले इंग्रजी गाणे
2 ‘CAA विरोधी आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही’
3 इंदुरीकर महाराजांकडून आता शिक्षकांची खिल्ली, शिक्षक संघटना नाराज
Just Now!
X