परतीच्या पावसाचा परिणाम

सांगली : परतीच्या मोसमी पावसाने गेले चार दिवस मुक्काम ठोकल्याने राज्यात अनेक ठिकाणी द्राक्षावर करपा, दावण्या या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून या रोगापासून द्राक्ष पीक वाचविण्यासाठी दिवसातून दोन वेळा औषध फवारणी करावी  लागत आहे. सलग पाउस पडत असल्याने द्राक्ष मण्यांची गळही सुरू झाल्याने नवेच संकट उभे ठाकले आहे.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

जिल्हयात तासगावबरोबरच मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ, पलूस, जत तालुक्यात द्राक्षाची लागवड झाली असून परतीचा मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वीच बहुसंख्य द्राक्ष बागांच्या फळछाटण्याची कामे आटोपली आहेत. ‘ऑक्टोबर हिट’चा  लाभ उठविण्याबरोबरच बाजारातील तेजीचा लाभ उठविण्यासाठी प्रामुख्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस छाटण्यांची कामे आटोपली गेली आहेत.

छाटणी झालेल्या द्राक्षांचे घड सध्या कळी म्हणजेच दोडावस्थेत आणि फुलोऱ्याच्या स्थितीत असलेल्या बागा सतत पडत असलेल्या पावसाने अडचणीत आल्या असून बुरशीजन्य रोगाबरोबरच गळीचाही सामना करावा लागत आहे. कळीच्या स्थितीमध्ये करपा आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत प्रामुख्याने दावण्या म्हणजेच पावडरी मिल्डयू याला बळी पडत आहेत. करप्याने कोवळी फूट, कोवळे घड करपून जातात, तर दावण्याच्या प्रादुर्भावाने फुलोऱ्यातील घड तत्काळ कुजू लागतात.

दावण्याची लागण एखाद्या पानावर पांढऱ्या ठिपक्याने दिसून येते. बागेत एखाद्या झाडावरील पानावर हा रोग आला की तीन ते चार तासात एक एकर बागेत पसरतो आणि एका रात्रीत कोवळ्या द्राक्ष घडाच्या मुळाशी जाउन हल्ला करीत असल्याने २४ तासात बाग हातची जाऊ शकते, यामुळे द्राक्ष बागायतदार हा रोग येणारच नाही याची दक्षता घेत असतात.

या रोगापासून द्राक्षाचा बचाव करण्यासाठी स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही अशा दोन प्रकारच्या औषधांचा मारा करावा लागत आहे. रात्रीच्या धुक्यामुळे सकाळच्यावेळी दव बिंदू पानावर असताना एम-४५, झेड-७८, कुमानएल, कॅपटॉप, एॅन्ट्रॉकल यासारख्या स्पर्शजन्य औषधांचा वापर करण्यात येत आहे. याच्या जोडीला पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेटचे मिश्रण वापरण्यात येत आहे. तर दुपारच्यावेळी र्कजट, एॅक्रोबट्र,मेलेडियओ, झॉप्रो सारखी आंतरप्रवाही औषधे वापरण्यात येत आहेत. सुडो पावडर, बॅसिलेस, मिलॅस्टिन सारख्या जीवाणूंचाही वापर करण्यात येत आहे.

बुरशी जन्य रोगांचा अटकाव रोखण्यासाठी दर वर्षी चार दिवसातून एकवेळ फवारणी करावी लागत होती. या वर्षी सलग पावसामुळे दररोज फवारणी करावी  लागत असून एक एकर द्राक्ष बागेसाठी एकावेळी तीन ते साडेतीनशे लिटर औषधांची फवारणी करावी लागत असून यासाठी अडीच ते तीन हजार रूपये एकावेळी खर्च येत असल्याचे द्राक्ष बागायतदार प्रशांत लिंबीकाई यांनी सांगितले. सध्या दिवाळीच्या बाजारापेक्षा कृषी औषधांच्या दुकानात रांगा  लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.