दुसऱ्या सत्तेत येऊन मोदी सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होत आहे. द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसकडून मोदी सरकारच्या निर्णयावर बोट ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. वरोरा शहर काँग्रेसतर्फे पाच वर्षात ५० टक्के भाववाढ या मथळ्याखाली लावलेले फलक लक्ष वेधून घेत असून, ‘मोदी सरकारचे अच्छे’च्या मथळ्याखाली असलेला हा फलक येथे चर्चेचा विषय झाला ठरला आहे.

काँग्रेसने लावलेला फलक.

या फलकात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या दराची २०१५ व २०१९ वर्षाची तुलना करण्यात आली असून, ‘पाच वर्षात ५० टक्के भाववाढ झाली असे सांगून मोदी सरकारचे अच्छे दिन! असा उपहासात्मक प्रश्न करण्यात आला आहे. याबाबत वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले म्हणाले, “पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. डिझेल व गॅस सिलेंडरचे दरही दिवसागणिक वाढत आहे. यामुळे वाढत्या महागाईत तेल ओतले जाऊन सर्वसामान्यांची आर्थिक गणितं पार बिघडून गेले आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य जनता आधीच आर्थिक संकटात सापडली असतांना त्यात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत,” अशी मागणीही टिपले यांनी केली.