News Flash

करोनाकाळात वसईच्या उद्योजकांचाही पुढाकार

वसईतील करोनाची स्थिती अत्यंत भयंकर बनू लागली आहे.

गोवालिस इंड्रस्टीजतर्फे पालिकेला ३ डय़ुऱ्या सिलिंडर भेट

वसई : वसईतील करोनाची स्थिती अत्यंत भयंकर बनू लागली आहे. या करोनाच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी आता वसईतील उद्योजकांनीसुद्धा पुढाकार घेत गोवालिस इंडस्ट्रीज यांच्यातर्फे प्राणवायूचा साठा ठेवण्यासाठी तीन डय़ुऱ्या सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत.

वसई-विरार शहरात काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी प्राणवायूची कमतरता भासत असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता प्राणवायूचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असला तरी तो ठेवायचा कुठे असा प्रश्न उपस्थित झाला होता. यासाठी वसई-विरार महापालिका व वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कारखानदारांना रिकामे सिलिंडर उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

त्यानुसार सुरुवातीला काही रिकामे सिलिंडर दिले दिले होते. मात्र शहरातील परिस्थिती पाहता जास्त प्राणवायू  साठय़ांचे सिलिंडर नसल्याने रुग्णालयांना जास्त फेऱ्या कराव्या लागत आहेत.यासाठी जास्त साठय़ांचे सिलिंडर कुठे मिळतील याची शोधाशोध सुरू झाली. चेन्नई येथील एका कंपनीत डय़ुऱ्या सिलिंडर तयार होतात. त्यांनाच ऑर्डर करून हे तीन सिलिंडर मागविण्यात आले आहेत. देण्यात आलेले प्राणवायू डय़ुऱ्या सिलिंडर २०० एच पीचे असून एका डय़ुऱ्या सिलिंडरमध्ये ३० ते ३५ जम्बो सिलिंडर इतका प्राणवायूचा साठा राहू शकतो. हे तिन्ही सिलिंडर शुक्रवारी महापालिकेच्या वरून करोना काळजी केंद्र या ठिकाणी पालिकेला सुपूर्द केले आहे. यामुळे वसईतील सर्वात मोठे

काळजी केंद्र येथे प्राणवायू खाटा व अतिदक्षता विभागातील( कउव) खाटा यांची सुविधा वाढविता येईल व करोनावर उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना प्राणवायूचा सुरळीत पुरवठा करता येईल असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने सांगितले आहे. यावेळी गोवालिस इंडस्ट्रीजचे अशोक ग्रोवर,  अजित सिंग,परेश शाह,  माजी महापौर नारायण मानकर , माजी उपमहापौर प्रकाश रौड्रिक्स, अति.आयुक्त देहरकर , वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा वाळके  ,नियंत्रण अधिकारी डॉ विनय सालपुरे, डॉ राजेश चौहान,  डॉ किरण काळे ,मनोज घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

ल्ल चेन्नई येथील एका कंपनीत डय़ुऱ्या सिलिंडर तयार होतात. तेथून तीन सिलिंडर मागविण्यात आले असल्याचे गोवालिस इंडस्ट्रीज असोसिएशनचे अशोक ग्रोवर यांनी सांगितले आहे. देण्यात आलेले प्राणवायू डय़ुऱ्या सिलिंडर २०० एच पीचे असून एका डय़ुऱ्या सिलिंडरमध्ये ३० ते ३५ जम्बो सिलिंडर इतका प्राणवायूचा साठा राहू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:32 am

Web Title: initiatives of vasai entrepreneurs during the coronation period ssh 93
Next Stories
1 ‘करोना’मुक्तीचे उद्दिष्ट
2 करोना नियंत्रणात आणणार
3 दिलासादायक : राज्यात आज ५९ हजार ५०० रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ८४.७ टक्के
Just Now!
X