News Flash

उपचार सुरू असताना जखमीचे निधन

शेतजमीन व विजेच्या मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत डोक्यात कुऱ्हाडीचा घाव लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील एका जखमीचे नाशिक येथे उपचार

| May 24, 2014 03:32 am

शेतजमीन व विजेच्या मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत डोक्यात कुऱ्हाडीचा घाव लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील एका जखमीचे नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले.
शेतजमिनीचा बांध व विजेच्या मागील कारणावरून हौशीराम भीमा गायकवाड, बाबासाहेब शंकर गायकवाड, लक्ष्मण शंकर गायकवाड, सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, भीमा शंकर गायकवाड यांनी अनिल गायकवाड यांच्या घरासमोर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. भाऊसाहेब गायकवाड व दत्तू गायकवाड यांच्या डोक्यात हौशीराम गायकवाड व बाबासाहेब गायकवाड यांनी कुऱ्हाडीने घाव घातला. जखमी भाऊसाहेब गायकवाड यांना उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना भाऊसाहेब गायकवाड यांचा मृत्यू झाला. अनिल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी हौशीराम गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, सोमनाथ गायकवाड, भीमा गायकवाड यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा पूर्वी दाखल करण्यात आला होता. या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व आरोपींविरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राहाता पोलिसांनी दिली.
        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:32 am

Web Title: injured died while undergoing treatment
टॅग : Rahata
Next Stories
1 सुपे एमआयडीसीसाठी लवकरच भूसंपादन- कवडे
2 अन्नभेसळीत जिल्हा आघाडीवर
3 अन्नभेसळीत जिल्हा आघाडीवर
Just Now!
X