माझे कु टुंब-माझी जबाबदारी मोहीम

कळवण : तालुक्यातील करोना प्रादुर्भावाची परिस्थिती चिंताजनक असल्याने प्रशासनाच्या वतीने सर्वतऱ्हेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य आणि एकात्मिक बालकल्याण, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून  घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली

तालुक्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत सर्वेक्षण झाले आहे.

पहिल्या टाळेबंदीत ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन लोकांच्या तपासण्या केल्या होत्या,त्या पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये प्राणवायूची पातळी मोजणे,  इतर लक्षणे आहेत का, घरी करोना बाधित रुग्ण आहे काय, हे पथकाकडून तपासले गेले. पथकामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक यांचा समावेश होता. या पथकास पल्स ऑक्सिमीाटर, थर्मल स्कॅनर आणि इतर  साहित्य तालुक्यातील संबंधीत ग्रामपंचायतींमार्फत पुरविण्यात आले होते. करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने पथकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले. यातून लवकर निदान, लवकर उपचार आणि मृत्यूदर कमी करण्यावर भर देण्यात आला.

पथकातर्फे प्राणवायू आणि तापमानाची पातळी तपासणे, लक्षणे असणाऱ्या लोकांवर तातडीने उपचार करणे, खोकला, ताप, घसा दुखणे, सर्दी, आदी करोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना तातडीने करोना के ंद्रात पाठविणे, नियोजनाप्रमाणे सव्‍‌र्हे करणे अशी कामे करण्यात आली. या पथकामध्ये ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचा समावेश करण्यात आला होता.

दुसऱ्या लाटेत करोनाविरुद्धची कृती योजना तालुका आरोग्य विभागाने केली आहे. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेविरुध्दचीही खबरदारी घेतली जाणार आहे. माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले. यात आढळणाऱ्या संशयितांची करोना तपासणी केली जाणार आहे. शहर, गाव, पाडे, तालुका परिसराला करोनाचा विळखा असून बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढतच आहे. असे असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

काही दिवसांपासून संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी अंदाज व्यक्त के ला जात आहे. यासाठी तालुका आरोग्य विभागाने तयारी केली आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही कुटुंब सर्वेक्षण मोहीम सुरु करण्यात आली असून या सर्वेक्षण मोहिमेत करोना संशयित शोधले गेले. संशयितांची तत्काळ चाचणी करुन बाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जाणार आहेत. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि शिक्षक यांचा पथकात समावेश असून  अनेक पथकानी तालुकाभरात घरोघरी जाऊन कुटुंबांचे आरोग्य कार्ड तयार केले आहे.

कळवण तालुक्यात आरोग्य विभागाअंतर्गत विविध पथकांमार्फत २७ हजार ५६७ लोकांना पथकांनी भेट देऊन तपासणी के ली. त्यात कळवण तालुक्यातील एकूण ४१६५८ पैकी ६०४० कुटुंबाची तपासणी करून ताप असलेले पाच रुग्ण, प्राणवायू पातळी कमी असलेले १४, उलटी,अंगदुखी असलेले आठ, सर्दी, ताप ,खोकला, आढळून आलेले १२२ रुग्ण असून आतापर्यंत कळवण तालुक्यात १४९ रुग्ण सव्‍‌र्हेक्षण दरम्यान आढळले आहेत. त्यामुळे ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी‘ या मोहिमेत व्यापक सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली.