News Flash

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, इन्स्पेक्टरने पोलीस महासंचालकांकडे केली तक्रार

त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पोलीस इन्स्पेक्टरने पोलीस महासंचालकांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली.

अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे इन्स्पेक्टर बी. आर.घाटगे यांनी पत्राच्या स्वरुपात एक तक्रार २० एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांना दिली असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही जोडून हे पत्र दिलं आहे.

सिंग यांच्या विरोधातली भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. गेल्या महिन्यात त्यांची मुंबई पोलीस आयुक्त या पदावरुन बदली करण्यात आली होती. पहिली तक्रार मुंबईचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी दाखल केली होती.

पोलीस महासंचालकांना दिलेल्या या १४ पानी तक्रारीमध्ये घाडगे यांनी सांगितलं आहे की सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. या पत्रात घाडगे यांनी सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसंच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप सिंग यांच्यावर केला आहे.

सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना घाडगे बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचंही घाडगे यांनी सांगितलं आहे.पीटीआयशी बोलताना घाडगे म्हणाले, “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन”.
यावर सिंग यांनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 7:25 pm

Web Title: inspector submits a request against former police commissioner parambir singh vsk 98
Next Stories
1 ‘…तोपर्यंत WhatsApp Admin ला दोषी ठरवता येणार नाही’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
2 …हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे; कृपया खोटं बोलणं थांबवा – सचिन सावंत
3 ‘एमबीबीएस’ परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार!
Just Now!
X