रवींद्र जुनारकर

गडचिरोली : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा समाज निर्माण करण्यासाठी सर्वानी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचा वापर करून जीवन व्यतित करणे गरजेचे आहे. याच मूलमंत्राचा वापर करीत जीवनाशी संघर्ष करून रोजंदारीवर सफाई कर्मचारी म्हणून काम करीत एका आईने आपल्या मुलाला तहसीलदार बनविले आहे. जितेंद्र सुरेश शिकतोडे असे त्यांचे नाव आहे. जितेंद्रची आई लता शिकतोडे यांनी मंगळवेडा नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून काम करीत मुलाला तहसिलदार बनविले आहे. चामोर्शीचे तहसीलदार म्हणून शिकतोडे यांनी आजच सूत्रे स्विकारली आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या संघर्षाची कथा मनाचा ठाव घेणारी आहे. अवघ्या १ वर्षाचे असताना वडील सुरेश शिकतोडे देहावसान झाल्याने अशा परिस्थितीत आई लता शिकतोडे यांनी या एक वर्षाच्या बाळाला सोबत घेऊन पुढील आयुष्य जगण्याचा निश्चय करीत आयुष्य जगायला सुरुवात केली. मंगळवेडा नगरपालिकेत पाच ते दहा रुपये रोजीने रोजनदारीवर सफाई कामगार म्हणून का करण्यास सुरुवात केली आणि मुलाला शिकविले. अशा हलाखीच्या परिस्थितीत स्वत:च्या पोटाला चिमटा घेत मुलाला मोठे करीत चांगले शिक्षण दिले आणि मुलाने सुद्धा उच्च शिक्षण घेत कुठेही शिकवणी वर्ग न लावता राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा (एमपीएससी) सलग अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात पास केली आणि तहसिलदार बनण्याचा बहुमान मिळविला.

एका सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा तहसिलदार झाल्याने त्या आईसाठी मोठ्या गर्वाची बाब आहे. त्या मंगळवेडा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. वर्षेभरापूर्वीच त्यांनी मुलाच्या आग्रहास्तव नोकरी सोडली. मुलगा तहसीलदार जरी झाला असला तरी ज्या नोकरीने आपल्या मुलाचे आयुष्य घडविले ती नोकरी कशी सोडायची या विचाराने त्या अस्वस्थ होत्या. मात्र मुलगा शासकीय सेवेत दाखल होताच त्यांनी हा नोकरी सोडली. अशा बिकट परिस्थितीतून तहसिलदार पदाची माळ गिरविणाऱ्या तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांचा परिक्षाविधीन कालावधी संपल्यामुळे नुकताच त्यांना कामठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्याम मदणुकर यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मुख्य उपस्थितीत निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी जितेंद्र शिकतोडे यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे शिकतोडे यांनी आजच नक्षलवादग्रस्त चामोर्शी येथे तहसीलदार पदाची सूत्रे स्विकारली आहे. दलित, शोषित, अन्यायग्रस्तांचा आदिवासी नक्षलवादग्रस्त जिल्हा अशी गडचिरोलीची सर्वत्र ओळख आहे. आता या भागातील आदिवासींचे शासकीय पातळीवरील प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम तहसीलदार शिकतोडे करणार आहेत.

मंगळवेढा येथेच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे डीएड अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर २०१५ मध्ये बी.ए.राज्यशास्त्र विषयाद पदवी प्राप्त करून २०१८ मध्ये एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली. २०१९ मध्ये तहसीलदार म्हणून कामठी येथे रूजू झालो. तेथील सहा महिन्याचा परिविक्षाधीन कालावधी संपला असून आता चामोर्शीत सहा महिने परिविक्षाधीन कालावधी आहे. परिविक्षाधीनचा हा शेवटचा टप्पा असून जनतेचे काम यालाच प्राधान्य राहणार आहे.
जितेंद्र शिकतोडे
तहसीलदार, चामोर्शी