मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत म्हणजेच एमएमआर अंतर्गत येणाऱ्या भागातील नागरिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. एमएमआर अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका, नगपरपालिका आणि जिल्ह्यांमधील भागामध्ये अंतर्गत प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता एमएमआर अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. सोप्या शब्दात सांगायेच तर मुंबईसहीत नऊ महानगरपालिका आणि नऊ नगरपालिकांबरोबर पालघर आणि रायगडमधील काही भागांतील रहिवाशांना एमएमआर अंतर्गत येणाऱ्या शहरामध्ये प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता लागणार नाही.

राज्य सरकारने गुरुवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सुधारित सूचनांनुसार एमएमआरमधील नागरिकांना आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. एमएमआरमध्ये प्रवासाचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी राज्यात इतर ठिकाणी आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाचे नियम कायम राहणार असल्याचेही, नवीन सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग एमएमआरमध्ये मोडतो. या नव्या सुचनांसंदर्भात ट्विटवरवरुनही पोलिसांकडे चौकशी केली जात आहे. पोलिसांनाही एमएमआरमधील प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

एमएमआरमधील अनेक पालिकांनी पत्रक जारी करुन नवीन सूचनांप्रमाणे सम-विषम तारखांना दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भातील परवानगी व्यापाऱ्यांना दिली आहे. आजपासून या सर्वांची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नऊ महापालिका

मुंबई
ठाणे
कल्याण-डोंबिवली
भिवंडी-निजामपूर
उल्हासनगर
पनवेल<br />नवी मुंबई<br />मीरा-भाईंदर
वसई-विरार

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नऊ नगर परिषदा

अलिबाग
पेण
अंबरनाथ
बदलापूर
माथेरान
कर्जत
खोपोली
उरण
पालघर

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणारे जिल्हे

मुंबई शहर (संपूर्ण जिल्हा)
मुंबई उपनगर (संपूर्ण जिल्हा)
ठाणे (संपूर्ण जिल्हा)
पालघर (जिल्ह्याचा आंशिक)
रायगड (जिल्ह्याचा आंशिक)