29 September 2020

News Flash

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांचे निधन

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

| September 20, 2014 03:48 am

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. अशोक रामचंद्र केळकर  यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. भाषाशास्त्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना साहित्य अकादमी, पद्मश्री आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
डॉ. अशोक केळकर यांचा जन्म २२ एप्रिल, १९२९ रोजी पुण्यात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुणे शहराच्या रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी तत्वज्ञान आणि इंग्लिश या विषयांची पदवी प्राप्त केली. रॉकफेलर आणि लिली या प्रतिष्ठानांतर्फे अनुक्रमे भाषाविज्ञान (१९५६ – ५८) आणि तौलनिक साहित्य व समीक्षा (१९५८) यांच्या अभ्यासासाठी त्यांस छात्रवृत्त्या मिळाल्या होत्या. त्यांच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी आग्रा विद्यापीठात १९५८-६२ या कालावधीत भाषाशास्त्राचे अध्यापन केले. १९६२-६७ दरम्यान ते पुणे विद्यापीठात रीडर होते. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी १९६७-८९. दरम्यान भाषाशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून, काम केले. त्या कॉलेजातील ’सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी इन लिंग्विस्टिक्स’चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली आहे. ते भाषाविज्ञानामध्ये एम.फिल. आणि पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 3:48 am

Web Title: international language expert dr ashok kelkar passes away
Next Stories
1 सोलापुरात खासगी आराम बस कंटेनरवर आदळून १८ जखमी
2 संग्राम जगताप यांचा मात्र प्रचार शुभारंभ
3 दर्डांच्या प्रचारतंत्राने आचारसंहितेचा भंग?
Just Now!
X