12 December 2019

News Flash

Women’s Day 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप टाकणाऱ्या ‘नवदुर्गा’

यापैकी एखादी महिला महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री कधी बघायला मिळू शकते, असे आशादायी चित्र तूर्तास तरी दिसते...

International Women’s Day 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा टक्का तसा जेमतेमच राहिला आहे. तरीही पुरूषसत्ताक विचारांची चौकट असलेल्या देशातील राजकीय पटलावर काही तरुणी आणि महिला समोर आल्या. सुप्रिया सुळे, पूनम महाजन, प्रिया दत्त, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, प्रणिती शिंदे, भावना गवळी, शायना एनसी, अंजली दमानिया ही त्यातील सध्याच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाची नावे. राजकीय पार्श्वभूमीमुळे संधी मिळालेल्या या तरुण महिलांनी स्वकर्तृत्त्वाने आपले राजकीय स्थान बळकट केले आहे. त्यामुळेच यापैकी एखादी महिला महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री कधी बघायला मिळू शकते, असे आशादायी चित्र तूर्तास तरी दिसते…

सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अभ्यासू नेत्या म्हणून परिचित आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रियाताईंनी राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रिया सुळे यांनी स्‍वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या विद्यामान खासदार आहेत. त्‍यांचे वडील शरदराव मुख्‍यमंत्री असतानाही त्‍या एसटी बसनेच कॉलेजमध्‍ये ये-जा करत. त्यानंतर पुण्‍यातून प्रकाशित होणा-या एका अग्रगण्‍य दैनिकात त्‍यांनी काही काळ नोकरीही केली. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्येही महाराष्ट्राची पताका फडकावली आहे. संसदेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना गौरवण्यात आले आहे.

पूनम महाजन – भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ह्यांच्या कन्या असलेल्या पूनम ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त ह्यांचा एक लाखांपेक्षा आधिक मतांने पराभव केला. वडिलांच्या अकाली निधनाने न खचता त्यांनी राजकारणात प्रवेश करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांमध्ये पूनम महाजन यांचे नाव घेतले जाते.

पंकजा मुंडे – गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून राजकारणात प्रवेश करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आपली वेगळी ओळख निर्णाम केली आणि राजकारणामध्ये दबदबाही वाढवला. २०१४ मध्ये पंकजा मुंडे भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होत्या.

प्रणिती शिंदे – माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची मुलगी असलेल्या प्रणिती शिंदेने आपल्या कर्तुत्वाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर केले आहे. अल्पवधीतच त्यांनी आपला ठसा उमटवला. सोलापूर येथून त्या आमदार म्हणून निवडूनही आल्या. काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्या म्हणून प्रणिती शिंदे यांना ओळखले जाते.

भावना गवळी – वाशिममधून चार वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार भावना गवळी. त्‍यांचे वडील पुंडलिकराव हे शिवसेनेचे अकोला जिल्‍हा प्रमुख होते. त्‍यांच्‍याकडूनच त्‍यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. १९९९ लोकसभा निवडणुकीत भावना गवळी खासदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी त्या फक्त २७ वर्षाच्या होत्या. त्यावेळी संसदेतील सर्वात तरूण खासदार म्हणून त्यांचे नाव देशभर गाजले होते.

विद्या ठाकूर – जेमतेम आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्या ठाकूर यांनी समाजिक कार्य करत अल्पाधितच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपलं घर केलं. सध्या त्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री आहेत.

प्रिया दत्त – सुनिल दत्त यांच्या कन्य प्रिया दत्त यांनी राजकारणामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन वेळा मुंबईमधून त्या खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत. २०१४ मध्ये पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रिया दत्त यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शायना एनसी – फॅशन डिजायनर असणाऱ्या शायना एनसी यांनी भाजपामध्ये प्रेवश केला. महाराष्ट्रातील भाजपाच्या अग्रगण्या नेत्यांमध्ये शायना एनसी यांना ओळखले जातो. अनेक सामाजिक कामामुळे शायना एनसी यांनी अल्पावधीतच लोकांची मने जिंकली.

अंजली दमानिया – सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अंजली दमानिया यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणुक लढवत राजकारणात प्रवेश केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर चर्चेत आल्या होत्या.

First Published on March 8, 2019 1:20 pm

Web Title: international womens day 2019 maharshtra top 9 women politician
Just Now!
X