राज्यामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापन झालेली नाही. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केला. मात्र राज्यापालांच्या विनंतीवरुन फडणवीस हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार असल्याचे फडणवीस यांनीच स्पष्ट केलं आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा मागील काही दिवसांपासून अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. त्यातच वेगवगेळ्या पक्षांचे नेते जवळजवळ रोज राजभवनावर जाऊन राज्यापालांची भेट घेत आहेत. एकीकडे रोज राज्यपाल यांच्या राजकीय नेत्यांबरोबरच्या भेटीच्या बातम्या येत असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सत्ता स्थापनेचा गुंता ‘जैसे थे’च आहे. यावरुनच आता नेटकऱ्यांनी अगदी गंमतीदारपणे राज्यपालांची व्यथा मांडली आहे.

१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली. मात्र कोश्यारी चर्चेत आले ते राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय तिढ्यामुळे. युतीमधील शिवसेना आणि भाजपा या मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन वाद झाला आणि सत्ता स्थापनेचा गुंता आणखीनच वाढला. त्यामुळेच निकालानंतर म्हणजेच २४ ऑक्टोबरपासून अनेकदा अनेक नेते राज्यपालांची भेट घेऊन आले आहेत. यामध्ये अगदी दिवाकर रावते, संजय राऊत, मुख्यमंत्र्यांबरोबर भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी राजभवनावर गेले होते. त्यानंतर राज्यापालांनी सत्ता स्थापनेसाठी भजापाला आमंत्रण दिले. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही असं भाजपाने रविवारी स्पष्ट केलं. त्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली. मात्र सोमवारी संध्याकाळी साडेसातपर्यंत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेची पत्रे राज्यपालांसमोर सादर करता आली नाही. त्यामुळेच राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देत २४ तासांची मुदत दिली. एकंदरितच राज्यपाल हे सतत चर्चेत आहेत. मात्र राज्यातील घडामोडी इतक्या वेगाने होत असूनही तिढा सुटलेला नाही. म्हणून नेटकऱ्यांनी नक्की काय चाललंय असा सवाल उपस्थित केला आहे. अनेकांनी सतत राज्यापालांना नेते मंडळी भेटत असल्याने त्यांची काय परिस्थिती झाली आहे हे मजेशीरपणे मांडले आहे.

मनसे,वंचित,बिचुकले सगळ्यांना एकदाच बोलवा

मी राज्यपाल झालो तर…

करमत नसेल…

कांदे पोहे चा कार्यक्रम?

या सगळ्या गोंधळात

संतापले

आहे तसं चालू द्या

चहा चा खर्च वाढवता

फोटो…

दिवाळीचा फराळ संपला

राजीनामा

१४४ असेल तरच या

सोमवारी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंबा पत्र मिळवण्यास अपयश आले. सोमवारी रात्री साडेसातपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वेळ दिला होता.