News Flash

आयपीएस अधिकारी अक्षय शिंदेसह चौघांना ३ लाख दंडाची नोटीस

शिंदे यांच्यासह लिपिक डोईफोडे यांना दोषी धरून दंडाची नोटिस काढण्यात आली.

प्रतिनिधिक छायाचित्र

नगर : नगरचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक (गृह) व सध्या जालना येथे एसआरपीचे समादेशक असलेले अक्षय शिंदे यांच्यासह चौघांना नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी माहिती अधिकाराखाली अर्ज केलेल्या १२ प्रकरणांमध्ये एकूण ३ लाख रु पये संयुक्त दंडाची नोटिस बजावली आहे. पोलिस खात्यातील बडतर्फ कर्मचारी संजीव भास्कर पाटोळे यांनी माहिती अधिकारातील अपिलामध्ये ही कारवाईमध्ये म्हणणे  सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. पाटोळे यांनीच ही माहिती दिली.

संजीव पाटोळे यांच्याविरु द्ध विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी अहवाल, कार्यालयीन टिप्पणी, चौकशी लिपिकाचे पद, नाव आदींची माहिती मिळण्यासाठी पोलिस उपअधीक्षकांकडे (गृह) पाटोळे यांनी अर्ज केला होता. माहिती न मिळाल्याने पाटोळे यांनी राज्य माहिती आयुक्त बिष्णोई यांच्याकडे दाद मागितली. त्यात अक्षय शिंदे व लिपिक गणेश डोईफोडे यांना दोषी धरून २५ हजारांचा दंड का आकारू नये, अशी नोटिस काढण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पाटोळे यांनी विभागीय चौकशी रद्द होण्यासाठी अर्ज दिला होता.  त्यामध्येही आयुक्तांनी अक्षय शिंदे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक अशोक परदेशी, लिपिक डोईफोडे या तिघांना दोषी धरून दंडाची नोटिस काढण्यात आली.

पोलिस मुख्यालयातील शौचालय व ३२ निवासस्थाने नादुरु स्त असल्याचा अहवाल पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दि. २९ जून २०१५ रोजी पाठवला होता. या अहवालाच्या अनुषंगाने माहिती अधिकारात मागवलेल्या माहिती संदर्भातही उपअधीक्षक आणि लिपिकास दंडाची नोटिस काढली आहे. पाटोळे यांनी नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने उपअधीक्षकांकडे कार्यालयीन टिप्पणी आणि जावक नंबरसह माहिती मागविली होती. या अर्जामध्येही त्यांना व लिपिक डोईफोडे यांना दंडाची नोटिस काढण्यात आली आहे. खात्यातून बडतर्फ केल्याच्या विरोधात पाटोळे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे अपिल दाखल केले. त्यासंदर्भातील माहिती अर्जावरही उपअधीक्षक, चौकशी लिपिक डोईफोडे यांना दोषी धरून दंडात्मक कारवाईसाठी नोटिस काढण्यात आली.

विभागीय चौकशीत खोटी माहिती देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी अर्जावरही माहिती विहित मुदतीमध्ये दिली नाही. शिंदे यांच्यासह लिपिक डोईफोडे यांना दोषी धरून दंडाची नोटिस काढण्यात आली. विभागीय चौकशीला उत्तर देण्यासाठी मागवलेल्या माहिती अर्जावरही पाटोळे यांनी आयुक्तांकडे अपिल केले होते. त्यातही परदेशी आणि डोईफोडे या दोघांना दोषी धरुन प्रत्येकी २५ हजारांचा दंड का करू नये, अशी नोटिस काढण्यात आली. पोलिस उपअधीक्षकांना ६ प्रकरणांमध्ये लिपिकांसह संयुक्त दंडाची नोटीस काढली आहे.

मुख्यालयातील लिपिक  डोईफोडेंना ९ प्रकरणात, तत्कालिन कार्यालय अधीक्षक परदेशी यांना ६ तर लिपिक चन्ना यांना २ प्रकरणांमध्ये संयुक्त दंडासाठी दोषी धरून नोटिसा काढण्यात आल्या. माहिती अधिकाराच्या अपिलात अर्जदार पाटोळे यांनी स्वत: काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:04 am

Web Title: ips officer akshay shinde other three receives 3 lakh penalty notice zws 70
Next Stories
1 ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते, नारायण राणेंचा दावा
2 “बाळासाहेबांच्या नातवाने सोनियांच्या नावाची शपथ घेणं यापेक्षा मोठा अपमान काय?”
3 हे गोवा नाही महाराष्ट्र आहे, इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही – शरद पवार
Just Now!
X