News Flash

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, असे आहेत बदल!

निकेत कौशिक यांना कोकण आणि ठाणे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पद देण्यात आले आहे

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, असे आहेत बदल!
संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे पोलीस सहआयुक्तपदी रविंद्र शिसवे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर आयपीएस अधिकारी मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलीस सहआयुक्तपदी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. रविंद्र सेनगावकर हे पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त होते त्यांना पदोन्नती देण्यात आली असून रेल्वे मुंबई येथील पोलीस आयुक्तपद देण्यात आले आहे.

मकरंद मधुकर रानडे हे अपर पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त होते त्यांना पदोन्नती देण्यात आहे. आता मकरंद रानडे हे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. राजकुमार व्हटकर हे मुंबईतील अस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक महणून कार्यरत आहेत. त्यांना नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त हे पद बदलीनंतर देण्यात आलं आहे. निकेत कौशिक हे सध्या रेल्वे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांना कोकण आणि ठाणे भागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद देण्यात आले आहे. ज्ञानेश्वर चव्हाण हे सध्या मुंबईच्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त आहेत. त्यांना मुंबईच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त असे पद देण्यात आले आहे. दिलीप सावंत हे मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपायुक्त आहेत. त्यांना मुंबई उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त हे पद देण्यात आले आहे. अशा प्रकारे या बदल्या करण्यात आल्याचे समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 10:23 pm

Web Title: ips officers transfers state level
Next Stories
1 महाराष्ट्रातील सहा डॉक्टरांचे लोकसभेत प्रतिनिधित्व 
2 पालघरमध्ये भगवा
3 पालघर जिल्ह्यात युतीचा जल्लोष!