13 August 2020

News Flash

करोनाच्या पार्श्वभूमीवर इराणी नागरिकाच्या पलायनाचे गूढ

इराणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

करोना आजाराचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण देशातील एका नागरिकाने नगर शहरात केलेल्या वास्तव्याचे आणि त्याच्या पलायनाचे गूढ निर्माण झाले आहे. या इराणी नागरिकासह हॉटेलचा मालक व व्यवस्थापक अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

इराणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, असे असताना हा इराणी नागरिक नगर शहरात स्वत:ची ओळख लपवून राहिला, त्याने बनावट कागदपत्रे दाखवून शहराच्या तारकपूर भागातील सिंग रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये एक दिवस वास्तव्य केले. शहरात सर्वत्र बंद असताना शहरातील हॉटेलमध्ये राहिला. करोना आजारापासून नागरिकांच्या जीवितास धोका आहे हे माहिती असूनही आपल्या कृतीमुळे धोकादायक कृत्य केले या आरोपावरून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल सिंग रेसिडेन्सीचा मालक कंवलजीत सिंग गंभीर ( ४७, रा.नगर), व्यवस्थापक रुपेश सोहनलाल गुलाटी ( २३ रा. तारकपुर, नगर),  ईराज हुसैन रेझई ( ४८ रा. तेहरान इराण) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हवालदार संतोष यशवंत मगर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहेत.

इराणी नागरिक सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळी नऊपर्यंत हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. नंतर तो कोणालाही न सांगता निघून गेला. हॉटेलच्या व्यवस्थापनाने त्याच्या कागदपत्रांबद्दल खातरजमा केली नाही. पासपोर्ट पाहिला नाही, केवळ कुठल्यातरी एका ओळखपत्राच्या आधारे त्याला वास्तव्य करण्यास परवानगी दिली, त्याने दिलेला मोबाइल क्रमांक ही  बनावट  असल्याचे आढळले, तसेच त्याने भारतीय नागरिक असल्याची नोंद  हॉटेलच्या नोंदवहीत केली  होती. असे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक हारुन मुलांनी यांनी सांगितले.

२६१ नागरिकांचा शोध

करोना संसर्गाचा धोका परदेशातून आलेल्या नागरिकांकडून अधिक निर्माण झाला आहे. नगर शहरातील रहिवासी असलेले परंतु परदेशातून परतलेल्या अशा २६१ नागरिकांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला आहे. मात्र या इराणी नागरिकांच्या वास्तव्याचा व पलायनाचा शोध लागलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:02 am

Web Title: iranian citizen escapes mystery in the wake of corona abn 97
Next Stories
1 जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड; तुटवडय़ाची भीती
2 ‘होम क्वारंटाइन’ असताना बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
3 करोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला बळी पडू नये
Just Now!
X