राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. राज्यातील नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने लागू केलेले निर्बंधही काही शिथिल केले आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मात्र असे जरी असले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. यावरून भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल आहे.

“सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने करोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. अशी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

तसेच, “दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील राणेंनी विचारला आहे.

या अगोदर बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नारायण राणेंची भेट घेतली होती, तेव्हा त्यांच्यात सिंधुदुर्गमधील करोना परिस्थितीसह अन्य मुद्यांवर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, राणेंनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे. यावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.