News Flash

“रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करु नये का?”

काँग्रेसचा भाजपाला सवाल; एका व्यावसायिकासाठी फडणवीस व दरेकर मध्यरात्री धाऊन जातात, पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे, असं देखील म्हटलं आहे.

संग्रहीत

मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर अधिकाऱ्याला सोडण्यात आलं. या सर्व घडामोडीमोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी

“एका व्यावसायिकासाठी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर मध्यरात्री धाऊन जातात आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे. महामारीमध्ये रेमडेसीवीरचा तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करु नये का?” असा सवाल सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांना केला आहे.

राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का गेले?; नवाब मलिकांकडून गंभीर आरोप

याबाबत सचिन सावंत यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “एका व्यावसायिकाचे हीतसंबंध सांभाळण्याकरता दोन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर मध्यरात्री धावून जातात आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, हे निश्चितपणे आश्चर्यकारक आहे. कारण, जनसामान्यासांठी त्यांनी असं पाऊल उचलेलं कधी ऐकलेलं देखील नाही. दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांचा काय दोष आहे? असा प्रश्न आम्ही विचारत आहोत. याचं कारण असं की पोलिसांकडे अशी माहिती होती की, त्यांच्याकडे माहिती होती मोठ्याप्रमाणावर रेमडेसिवीरचा साठा या कंपनीच्या मुंबई परिसरातील निर्यातदाराकडे पडून आहे. जो कळवला गेला नाही, तो दडवला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या संचालकांना बोलवण्यात आलं होतं. परंतु उडवाउडवी करण्यात आली आणि दोन दिवसानंतर ते आले. करोना परिस्थितीत मुंबई पोलिसांकडून काय अधिक अपेक्षा असणार आहे? की ज्या पद्धतीने रेमडेसिवीरचा तुटवडा आपल्याला भासतो आहे. अनेक लोकं मरत आहेत, अशावेळी मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं परंतु हे भाजपाच्या नेत्यांना आवडलेलं नाही ते बिथरले व रात्री जाऊन त्यांनी मुंबई पोलिसांना जाब विचारला. हे आश्चर्यकारक आहे. एकंदरच मुंबई पोलिसांनी ज्या तत्परतेने आपलं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्याचं आम्ही अभिनंदन करतो आहोत आणि भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध करतो आहोत.”

“मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिली अन् त्यानंतर….,” फडणवीसांचा गंभीर आरोप

दरम्यान, ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 2:16 pm

Web Title: it is amazing fadnavis and darekar run in the middle of the night and put pressure on the police for a businessman msr 87
Next Stories
1 “करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते,” शिवसेना आमदाराचं वक्तव्य
2 … तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल; जितेंद्र आव्हाडांचं केंद्र सरकारला उत्तर
3 “बोलबच्चन ठाकरे सरकार करोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय”
Just Now!
X