News Flash

देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही – नवाब मलिक

शिवसेनेच्या अजान स्पर्धेला भाजपाने केलेल्या टीकेवर मलिक यांचं भाष्य

संग्रहीत

देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपाला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. याला भाजपाने आक्षेप घेतला असून त्याला मलिक यांनी उत्तर दिलं आहे.

मलिक म्हणाले, शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला आहे. मात्र, सोलापूर व इतर जिल्ह्यात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे.

दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. हे करताना त्यांनी मंदिरांमधील अनेक सीनही केले आहेत, याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केलं आहे असा होत नाही, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 7:55 pm

Web Title: it is wrong to put religions spectacles on art and acting in the country says nawab malik aau 85
Next Stories
1 ‘मोदी’ नावाच्या बकऱ्यासाठी लागली लाखोंची बोली; पण मालकाला हवेत दीड कोटी
2 हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते – नारायण राणे
3 भजन-किर्तनातून नव्हे तर अजान ऐकण्यातून शिवसेनेला मनःशांती मिळतेय – तुषार भोसले
Just Now!
X