नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्य़ाची सुरक्षाव्यवस्था आता इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहे. याआधी येथे तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) येथून हटवण्यात आले आहे.
सीआरपीएफ बटालियनमधील जवानांना माघारी बोलावण्यास सुरुवात झाली असून त्यानंतर काही दिवसांतच गडचिरोली जिल्ह्य़ाची सुरक्षाव्यवस्था इंडो-तिबेटियन पोलिसांच्या हाती सोपवण्यात येईल. या दोन्ही प्रक्रियांसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे सीआरपीएफच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कौशिक यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील डोंगर भागात तैनात करण्यात आलेल्या इंडो-तिबेटियन सीमा दलाच्या जवानांना प्रशिक्षणाचा या प्रक्रियेत समावेश आहे. या भागात अशी प्रक्रिया पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे आणि या संदर्भातील सरकारच्या निर्णयानंतर ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या जागी इंडो-तिबेटियन दलाचे जवान तैनात करण्यात येत आहेत, असे कौशिक म्हणाले. यातील काही जवान महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे त्यांना गडचिरोली भागात सेवेत असताना आपल्या कुटुंबीयांच्या जवळ राहता येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की गोपनीय माहिती गोळा करण्याची व्यवस्था यामुळे नष्ट होणार नाही. कारण प्रत्येक दलाची माहिती घेण्याची पद्धत वेगळी असते. यात राज्य पोलीस दलाचीही मदत मिळणार आहे. त्यामुळे गुप्त माहिती मिळवण्याच्या पद्धतीत कोणताही अडथळा येणार नाही.
पवारांची फोटोळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभागी झालेल्या पवार कुटुंबियांनी शुक्रवारी बारामतीतील रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवले. यावेळी पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी उपस्थित होते.