23 November 2017

News Flash

सिंधुदुर्गचा आर्थिक विकास होईल! – जॅकी श्रॉफ

जिल्हा विकासाचे व्हिजन ठेवून काम सुरू असल्याने सिंधुदुर्ग बदलतोय.

सावंतवाडी, वार्ताहर | Updated: September 11, 2017 1:34 AM

जिल्हा विकासाचे व्हिजन ठेवून काम सुरू असल्याने सिंधुदुर्ग बदलतोय. येथील निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता, हस्तकला, म्युझियम्स, स्पोर्ट्समध्ये काम करून त्यांचे मार्केटिंग झाल्यास जिल्ह्य़ाचा आर्थिक विकास होईल, असे सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांनी म्हटले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर चांगले व्हिजन ठेवून काम करीत आहेत. त्यांना साथ देण्याचेदेखील जॅकी श्रॉफ यांनी स्पष्ट केले. दीपक केसरकर यांच्यासमवेत यशवंतगड किल्ला, आरोंदा किरणपाणी बंदर जलविहार, रेडी, सावंतवाडी राजवाडा व हस्तकला, शिल्पग्राम, म्युझियम्स, एम्पोरियम प्रकल्पांना त्यांनी भेट दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आपण अनेक वर्षे येत आहोत. आता सिंधुदुर्ग बदलतोय, असे सांगून जॅकी श्रॉफ म्हणाले, यापूर्वी मला उद्धव ठाकरे यांनी पाठविले होते. आज पालकमंत्री केसरकर यांच्यासमवेत आलो आहे. केसरकर यांनी आपणास आज दाखविलेली पर्यटनस्थळे आणि मी यापूर्वी यशवंतगड ते विजयदुर्गपर्यंत पाहिलेल्या अथांग, स्वच्छ व सुंदर सागरी किनाऱ्याचे पर्यटनदृष्टय़ा मार्केटिंग करण्यासाठी माझा उपयोग करून घेतल्यास किंवा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरची जबाबदारी माझ्यावर टाकल्यास ती मी आनंदाने स्वीकारीन, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

First Published on September 11, 2017 1:34 am

Web Title: jackie shroff on sindhudurg district