27 November 2020

News Flash

VIDEO: कॅशलेस दुकानाद्वारे कष्टकऱ्यांची मदत करणाऱ्या अनघा ठोंबरे

कष्टकऱ्यांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी

कष्टकऱ्यांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य कोथरुड येथील अनघा ठोंबरे करत आहेत. त्यांचं हे कार्य ‘कॅशलेस दुकान’ या नावाने प्रसिद्ध आहे. अनघा ठोंबरे यांचे कॅशलेस दुकान त्यांच्या स्वतःच्या बंगल्यातच आहे. ज्याला कुणाला काही नको असेल किंवा इतरांसाठी काही देण्याची इच्छा असेल ते त्या त्या गोष्टी इथे आणून देतात. तसेच ज्यांना काही वस्तूंची गरज आहे तेथे येऊन त्या वस्तू घेऊन जातात आणि आनंदाने त्याचा उपयोग करतात. कपडे, इलेक्ट्रिकच्या वस्तू, भांडी, साबण, तेल, औषध अशा अनेक गोष्टी येथे मिळतात. ‘जागर नवदुर्गा’मध्ये अनघा ठोंबरे यांच्या या समाजसेवेबद्दल जाणून घेऊयात…

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 8:57 am

Web Title: jagar navdurgancha angha dongre runs cashless shop on barter system in pune sgy 87
टॅग Navratra
Next Stories
1 शिवसेनेकडून नरेंद्र मोदींचं कौतुक; गेल्या आठ महिन्यांतील उत्तम संबोधन केल्याची पावती
2 गाडी आली, पण वेळ निसटली
3 रुग्णालयातील जैविक कचरा शेतात?
Just Now!
X