News Flash

उकळत्या गुळाच्या काहिलीत उडी मारुन कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न 

कामगाराच्या या आत्महत्येच्या प्रयत्नाची नोंद सीसीटीव्हीमध्ये झाली आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्हापुरातील कसबा वाळवा या ठिकाणी एका गुऱ्हाळ कामगाराने गुळाच्या उकळत्या काहिलीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. गौतम मल्लू कांबळे असे या कामगाराचे नाव असून तो २२ वर्षांचा आहे. गौतम हा मूळचा तामगावर करवीर येथील रहिवासी आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर येथे उपचार सुरु आहेत.
कसबा वाळवा या ठिकाणी सचिन शिवाजी पाटील यांच्या गुऱ्हाळ घरावर गौतम कांबळे ऑक्टोबर महिन्यापासून काम करतो. आज कामावर आल्यानंतर काही वेळातच गौतमने उकळत्या काहिलीत उडी घेतली. त्याच्या सहकारी कामगाराला काहिलीमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्याने जाऊन पाहिले असता गौतम काहिलीत पडल्याचे दिसले. त्यानंतर त्याने आरडाओरड केली. काहिल उकळत असल्याने बराचवेळ गौतमला वाचवता आले नाही. मात्र त्यानंतर फावड्याच्या मदतीने गौतमला बाहेर काढण्यात आले. गुऱ्हाळ मालक सचिन पाटील यांनी त्याच्या मोटारीतून गौतमला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेत गौतम ९५ टक्के भाजला आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीत घटना नोंद
गुऱ्हाळ घरातील कामगारांच्या मध्ये चेष्टा मस्करी मध्ये चुलवानात, काहिलीत पडणे, तर काही वेळा जाणूनबुजून ढकलून दिल्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. त्यामुळे गुऱ्हाळघरात तीन सीसीटीव्ही बसवले आहे. त्यातील एका सीसीटीव्ही मध्ये गौतम कांबळे याने उडी घेतल्याचे चित्रीकरण नोंदले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 8:26 pm

Web Title: jaggery laborer try to suicide now in hospital
Next Stories
1 बारामतीत या, तुम्हाला दाखवतोच! अजित पवारांचा महाजनांना इशारा
2 मनुष्यबळ विकास मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने माजी सैनिकांना ३० लाखांना गंडा
3 मराठा आरक्षणविरोधी याचिका फेटाळण्याची विनंती; सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
Just Now!
X