तुरूंगातील जीवनाविषयी ऐकायला आणि बघायला मिळतं. सिनेमा आणि मालिकांमधून तुरूंगातील जीवन पडद्यावर दिसतं. मात्र, प्रत्यक्षात तुरूंग बघायचा असेल, तर तशी सोय आतापर्यंत नव्हती. राज्य सरकारने याचं दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं असून, तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात २६ जानेवारी २०२१ पासून होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुरूंग पर्यटन योजनाचं उद्घाटन करणार असून, टप्प्यानं राज्यातील इतर जेलचा यात समावेश केला जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दलची माहिती दिली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंग आहे. जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

तुरूंगात घडलेल्या ज्या ऐतिहासिक घटना आहे. त्या नागरिकांना बघता येणार आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबंडेकर यांच्यामध्ये जिथे पुणे करार झाला, ती जागा व्यवस्थित आहे. ज्या बराकीमध्ये महात्मा गांधींना ठेवलं होतं. तोही व्यवस्थित आहे. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवण्यात आलेले सेल आहेत. ते विद्यार्थ्यांना, नागरिकांना बघता येणार आहे. त्यानिमित्ताने इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल. येरवडा जेलपासून याची सुरूवात झाल्यानंतर राज्यातील इतर तुरूंगात पर्यटन योजना सुरू केली जाईल, असं देशमुख यांनी सांगितलं.