सिंधुदुर्गात शासकीय मेडीकल कॉलेज, मल्टीस्पेशलीस्ट हॉस्पीटलसह अत्याधुनिक प्रयोगशाळा होण्यासाठी पुढील काळात सरकार प्रयत्न करेल, पुढचे सरकार शिवसेनेचेच राज्यात येईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

वेंगुर्लेत ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालयाच्या भूमीपूजन प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी उद्योगमंज्ञी सुभाष देसाई, पालकमंत्री दिपक सेरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष दिलीप गिरप, विक्रांत सावंत, अरुण दुधवडकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेने शब्द दिल्यानंतर कामे मार्ग लागतात. मी शब्द दिल्यावर त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधी करतात. त्यामुळेल लाल फितीत अडकलेला विकास सत्यात उतरतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. डॉ. द्वारकानाथ कोटणीस जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी चीनमध्ये जावून शांतीदूत म्हणून कामगिरी करत आरोग्य सुविधा दिली. त्यांच्याच गावात सक्षम आरोग्य यंत्रणा नसेल तर ते लांच्छनास्पद आहे. त्यामुळे आरोग्यसेवा व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरोग्य सेवेसाठी सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टकडून एक कोटी देण्यात आले आहे, असे सांगून गोवा राज्यावर आरोग्य यंत्रणेसाठी अवलंबून राहणे भूषणावह नाही. त्यासाठी मल्टीस्पेशलीस्ट हॉस्पीटल निर्माण व्हायला हवे तसेच सिंधुदुर्गात शासकीय मेडकल कॉलेज, अत्याधुनिक प्रयोगशाळा देखील निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जैतापूर औष्णीक, रिफायनरी असे कोकणच्या निसर्ग सौंदर्याची राख करणारे प्रकल्प कोकणात आणि गुजरातमध्ये रांगोळी घालणारे प्रकल्प उभारण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. कोकणाला अथांग समुद्र, निसर्गसौंदर्य लाभले आहे. त्यामुळे त्यावर आधारीत प्रकल्प उभे रहायला हवे. औष्णीक, रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकरल्प गुजरातमध्ये घेवून जा, आम्ही महाराष्ट्र इभा करायला सक्षम आहोत, तुमचे उपरकार नको असा टोला पंतप्रधानांना उद्धव ठाकरे यांनी हाणला.

मुंबई व कोकणात नवीन आजार निर्माण होत आहेत. माकडताप, लेप्टो, डेंग्यु, स्वाईन फ्लूयसारख्या आजारांवर संशोधन करणारी प्रयोगशाळा कोकणात व्हायला हवी, असे सांगून सम्राट खूप पोसले. जनतेने सम्राट केले पण ते जनतेच्या उपयोगी आले नाही पण पुढचे सरकार शिवसेनेचेच येणार असल्याने मेडिकल कॉलेज, मल्टीस्पोशालीस्ट हॉस्पीटल, संशोधन प्रयोगशाळा उभारण्याचा मी शब्द देतो तसेच कोकणचा विकास करण्यास शिवसेना कटिबद्ध आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या वेळी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी ५० खाटांच्या रुग्णालय व डॉक्टरांची माहिती दिली. खासदार विनायक राऊत यांनी विचार मांडले. या वेळी ५० खाटांच्या रुग्णालयाचे भूमीपूजन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.