जालना शहरातील सुंदरनगर भागातील तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन हिंगोली जिल्ह्यत डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या संदर्भात चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी १३ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली म्हणून तक्रार नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा पोलीस शोध घेत होते. संशयितांवर पाळत ठेवल्यानंतर पीडित मुलीस सेनगाव येथे एका शेतात डांबून ठेवले असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यतील आरोपी दत्ता धनगर याच्यासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलीची विक्री करण्याचा आरोपींचा डाव होता किंवा कसे, या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
शुक्रवारी रात्री उशीरा जालना जिल्ह्यतील दोन महिलांना अटक केली आहे. या पूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यात बलात्काराचे कलम वाढविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी सांगितले. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2019 10:55 am