02 December 2020

News Flash

हृदयद्रावक! विजेच्या धक्क्याने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यत घडली घटना

प्रातिनिधिक

विजेच्या धक्क्यात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावात बुधवारी रात्री घडली. दिवसभर वीज नसल्यामुळे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या भावाला विजेचा धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वात मोठा भाऊ विवाहित होता. तर इतर दोघेही अविवाहित होते. या हृदयद्रावक घटनेमुळे पळसखेडा गावांवर शोककळा पसरली आहे.

ज्ञानेश्वर जाधव (२७ वर्ष), रामेश्वर जाधव (२५ वर्ष) आणि सुनील जाधव दुर्वेवी मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर जाधव विद्युत मोटार सुरु करत असाताना विजेचा शॉक लागल्यामुळे विहिरीत पडला. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या रामेश्वर आणि सुनील यांनाही विजेचा धक्का बसला अन् तेही विहिरीत पडले. विहिरीतही करंट उतरल्यामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह हसनाबादचे सहायक पोलीस निरीक्षक आणि इतरांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य केलं. गावकऱ्यांच्या मदतीनं बाजेच्या साह्यानं तीन भावाचे मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:06 pm

Web Title: jalana thress brother death sue to electric corrunt nck 90
Next Stories
1 …मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
2 …आणि मग ‘पेंग्विन गँग’ची पार्टी सुरु; वीज बिलांवरुन नितेश राणेंचा खोचक टोला
3 ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश, वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला
Just Now!
X