23 January 2020

News Flash

जळगावमध्ये मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या

जळगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) माजी पदाधिकाऱ्याची हत्या

जळगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) माजी पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचं वृत्त आहे. शहरातील कासमवाडी परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून श्याम दीक्षित असं हत्या झालेल्याचं नाव आहे. कासमवाडी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराच्या प्रांगणात सकाळी श्याम दीक्षितचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिरायला आलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्याम दीक्षित हा मनसेचा माजी पदाधिकारी होता. मनसेचा शहर उपाध्यक्ष म्हणून त्याने काम पाहिले होते. मात्र, अद्याप हत्येचं कारण उलगडलेलं नाही. राजकीय वैमनस्यातून दीक्षित यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस तपास सुरू आहे.

First Published on August 25, 2019 12:56 pm

Web Title: jalgaon former mns worker shyam dixit killed sas 89
Next Stories
1 प्रस्तावित तेल रिफायनरी क्षेत्रात जमीन घोटाळा
2 रेल्वेच्या सहा जलाशयांची संरचनात्मक तपासणी
3 पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याचीच
Just Now!
X