News Flash

‘…तर आम्ही पुन्हा येऊ’, धमकी देत 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर झाले पसार

व्यावसायिकाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा...

जळगावमध्ये दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूच्या धाकावर 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी 3 लाख रुपये रोख आणि 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला.

3 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शहरातील मोहाडी रोड परिसरात दौलतनगर येथे ही घटना घडली. पिंटू बंडू इटकरे (वय 35) यांच्या घरात हा दरोडा पडला. पिंटू इटकरे हे पत्नी मनीषा आणि तीन वर्षांची मुलगी हरीप्रिया यांच्यासोबत राहतात. इटकरे यांचा लोखंडी रॉडचा होलसेलचा व्यवसाय असून ट्रेडिंग कंपनी आहे. पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्कसह रुमाल बांधलेले तसेच हातात धारदार शस्त्र असलेले सहा जण कटरने लाकडी दरवाजा कापून आतील कडी उघडून इटकरे यांच्या दुमजली घरात घुसले. घरात झोपलेल्या सदस्यांना उठवून चाकूचा धाक दाखवत आणि ‘घरात जे असेल ते काढून द्या’ असं धमकावत दरोडेखोरांनी घरातील तीन लाखांची रोकड व दागिने काढून घेतले. परत जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल तसेच घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्सही काढून नेला. तसेच पोलिसांना प्रकार कळवला तर आम्ही पुन्हा येऊ तसेच तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकीही दिली. ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाइल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.

नंतर, घाबरलेल्या इटकरे दांम्पत्याने नातेवाईकांना प्रकार कळवला व सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रामानंद नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 11:25 am

Web Title: jalgaon robbery six armed men barge into businessman house looted cash and jwellery rs 23 lakh sas 89
Next Stories
1 “सरकारचे येथे असे काही धंदे चालतात की…”; राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका
2 “…संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,” शिवेंद्रराजेंची जाहीर कार्यक्रमात धमकी
3 मुलांना बंगल्यात डांबून ठेवल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…
Just Now!
X