22 January 2021

News Flash

धक्कादायक घटना! प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पतीनंही स्वतःला संपवलं

पत्नीच्या विरहात घेतलं विष

संग्रहित छायाचित्र

प्रेमविवाह करून सासरी नांदण्यास गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये ही घटना घडली. या घटनेला काही तास लोटत नाही, तोच तरुणीच्या पतीनंही स्वतःला संपवलं. पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे, तर तरुणीचे नाव आरती आहे.

जळगाव जिल्ह्यात पाळधी गावातील आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं. घरातून विरोध असल्यानं दोघेही काही दिवस घरातून बेपत्ता होते. त्यानंतर दोघेही लग्न करुन घरी परतले. दोघे घरी आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. दोघांच्याही पालकांनी विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला. मात्र, सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. आरतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी पती प्रशांतनेही विषारी औषध घेतलं. त्यामुळे त्याचीही प्रकृती खालावली. त्याला जळगाव इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांतचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या मृत्यूच्या घटनेमुळे पाळधी गावातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मयत आरतीचे सासरे विजयसिंग पाटील, मृत प्रशांतचे मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी या तिघांना शनिवारी अटक केली. आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर अवघ्या ३-४ दिवसातच आरतीचा मृत्यू झाला. आरतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी प्रशांतनेही विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. पोलिसांनी या प्रकरणाता तिघांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 11:52 am

Web Title: jalgaon suspected death of married couple three arrested by police bmh 90
Next Stories
1 …पण घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!; नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र
2 वहिनी, एक व्यक्ती म्हणून आपणाला चांगलं ओळखतो आणि…; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र
3 ‘किशोर’ मासिकाचे पन्नाशीत पदार्पण
Just Now!
X