News Flash

मृत रूग्णाच्या खिशातील ४५ हजार रुपये चोरल्याचा नातेवाईकांचा वॉर्ड बॉयवर आरोप

उपचारादरम्यान रूग्णाच्या फोन पे वरून पैसे काढल्याची देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

संग्रहीत

जालना येथील शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाच्या फोन पे वरून रक्कम काढली, त्यानंतर रूग्णांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या खिशातील ४५ हजार रूपये देखील चोरल्याचा आरोप, मृत्यू झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयाच्या वॉर्ड बॉयवर केला आहे. तसेच, या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली आहे.

जालन्यातील शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातवाईकांनी कोविड रुग्णालयातील वॉर्ड बॉयवर पैसे चोरीचा आरोप केला आहे. रुग्णाच्या अंगठ्याचा वापर करून त्यांच्याच फोन पे वरून वॉर्ड बॉयने ६ हजार ८०० रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

तर, रुग्णाच्या खिशात असलेले ४५ हजार रूपये देखील वॉर्ड बॉयनेच काढून घेतल्याचा आरोप देखील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच, या संदर्भात पोलीस तक्रार घेत नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी रुग्णाच्या नातवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 7:28 pm

Web Title: jalna ward boy accused of stealing rs 45000 from dead patients pocket msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धा : रूग्णांना ‘बेड’ मिळत नसल्याने टास्क फोर्सच्या बैठकीत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2 पंकजा मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीचं करोनामुळे निधन; फेसबुकवरुन दिली माहिती
3 Covid: “मी पत्नीला मरण्यासाठी कसं काय सोडून देऊ?”, रुग्णालयाबाहेर पती विनवणी करत राहिला, पण….
Just Now!
X