News Flash

जालना जि.प. निवडणुकीतून भाजपाची माघार; महाविकासआघाडीचा सत्ता

अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची निवड

संग्रहीत

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या महाविकासआघाडीचा परिणाम आता स्थानिक निवडणुकांवर देखील जाणवत आहे. बीड जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर, आता जालना जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाने माघार घेतली आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळे जालना जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीची सत्ता आली आहे.

येथील जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे उत्तम वानखेडे यांची जिल्हापरिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे.

माझा एकमेव फार्म जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी दाखल झालेला असल्याने, माझी बिनविरोध निवड झाली, याबद्दल मी सर्व नेत्यांचे व महाविकासआघाडीचे मी आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया उत्तम वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

महाविकासआघाडीतील शिवसेनेचे सदस्य असलेल्या उत्तम वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दुपारी १ वाजेपर्यंत दाखल झाला होता. तर, अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत भाजपाचा कोणताही उमेदवारी अर्ज आला नव्हता. याला कारण, पुरेसं संख्याबळ भाजपाकडे नव्हतं. भाजपाकडून माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे व भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी प्रयत्न केले. मात्र, संख्याबळाचा आकडा न जुळल्याने अखेर भाजपाने माघार घेतली.

जालना जिल्हापरिषदेत सध्या भाजपा – २२, शिवसेना – १४, राष्ट्रवादी -१३, काँग्रेस -५ व अपक्ष – २ असे संख्याबळ आहे. या अगोदर जिल्हापरिषद अध्यक्ष शिवसेनेचाच होता. तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा होता. आता पुन्हा या अशीच परिस्थिती असणार आहे. उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या उमेवदवाराची वर्णी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 2:28 pm

Web Title: jalna zp election mahavikasaaghadi in power msr 87
Next Stories
1 ‘ठाकरे’ आडनाव नसतं तर राज संगीतकार झाले असते; गुलाबराव पाटलांची सडकून टीका
2 नरखेडमध्ये सापडलेला सांगाडा सातवाहन कालीन?
3 जेएनयूमधील हिंसाचार पाहून २६/११ मुंबई हल्ल्याची आठवण झाली – उद्धव ठाकरे
Just Now!
X