पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात नायब सुभेदार सुनील रावसाहेब वाल्टे शहीद झाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी प्रत्युत्तर देत असताना सुभेदार सुनील रावसाहेब वाल्टे शहीद झाले. ४० वर्षीय सुनील मूळचे अहमदनगरमधील दहिगाव गावचे निवासी होते. त्यांच्या मागे पत्नी आई, वडील, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नियंत्रण रेषेवर अंधारात संशयित हालचाली सुरु होत्या. यावेळी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर भारतीय लष्कराकडूनही तात्काळ उत्तर देत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पाकिस्तान लष्कराचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारात नायब सुभेदार सुनील गंभीर जखमी झाले होते. मात्र उपाचारादरम्यान ते शहीद झाले. शहीद वाल्टे यांचा लष्करातील सेवाकाळ संपला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी पाच वर्षांसाठी आपली कामाची मुदत वाढवून घेतली होती. लवकरच ते निवृत्त होणार होते.

तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे मंगळवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा जवनांनी अवंतीपोरा येथे दोन ते तीन दहशतवादी एका घऱात लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्ककाने घराला चारही बाजून घेरलं होतं. सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

सुत्रांकडून त्राल येथे दहशतवागी लपले असून खोऱ्यात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला असता चकमकीला सुरुवात झाली होती.