News Flash

जव्हारजवळील जामसर तलाव पाणथळ जागा घोषित

ग्रामसभेत ठराव मंजूर; जैवविविधता संरक्षण-संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आराखडा सादर 

(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत

जव्हारजवळ जामसर गावातील प्राचीन तलावाला पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. अशा प्रकारे तलाव पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पाणथळ जागा आणि जैवविविधता संरक्षण-संवर्धन तसेच शाश्वत विकासाबाबतचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने पाणथळ जागा अधिनियम तयार केल्यानंतर पालघर जिल्ह्य़ातील ८७ पाणथळ जागांसंदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यात जामसर तलावाचा समावेश होता. या तलावाचा उल्लेख राष्ट्रीय पाणथळ जागा नकाशातही नमूद करण्यात आला आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ५१ तसेच ४८ नुसार प्रत्येक नागरिकाचे तसेच शासनाचे निसर्ग संवर्धन करणे हे प्राथमिक व मूलभूत कर्तव्य असल्याने त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी जामसर येथील वारसा तलाव पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याचा ठराव ऑक्टोबरमध्ये घेण्यात आला.

जामसर तलाव पाणथळ तसेच गावातील जैवविविधतेचे प्राचीन स्थळांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने जामसर पाणथळ आणि जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली. या दृष्टीने नियमन आणि देखरेखीचे काम ग्रामस्थांच्या माध्यमातून करावे यासाठी ग्रामसभेने खास ठराव संमत केला आहे.  यासाठी जामसर पाणथळ आणि जैवविविधता समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच या समितीला वेळोवेळी सल्ला देण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे योजण्यात आले आहे. ग्रामस्थांनी जामसर तलावाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.  ते गावातील प्रत्येकाला ते पाळणे बंधनकारक राहणार आहे.

नियोजनातील काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव

* जामसर तलावाच्या स्वतंत्र क्षेत्रात  ५९ वनस्पतींचे अस्तित्व आढळले आहे. त्यापैकी १० दुर्मीळ प्रजाती आहेत. दोन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर एक अत्यंत दुर्मीळ मानली जाते. या वनस्पतींच्या जतनासाठी विशेष योजना तयार करण्यात येणार आहे.

* मुंबई विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील दोन अभ्यासकांना जामसर पाणथळ जागेजवळ पुरातत्त्व सर्वेक्षणात ११४ कलाकृती सापडल्या आहेत. या कलाकृती सहावे ते तेराव्या शतकादरम्यानच्या असाव्यात असा होरा अभ्यासकांनी मांडला आहे. जामसर तलावाजवळ पुराणकालीन रस्ताही आढळल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

*व्यापारादरम्यान या मार्गाचा वापर केला जात असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:01 am

Web Title: jamsar lake near jawahar declared a wetland abn 97
Next Stories
1 सणाला करोनाचे भय नाही!
2 पाच महिने दुर्गंधीचा मारा
3 आदिवासींचा नवसफेडणीचा दिवस ‘वाघबारस’
Just Now!
X