पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित जाणता राजा या महानाटयाचा प्रयोग बारा वर्षांनी पुण्यात सादर होणार आहे.  पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या शिंदे मैदानावर २५ ते २९ डिसेंबर रोजी सादरीकरण होणार आहे. अशी माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, “जाणता राजा महानाटय प्रयोगास १५ एप्रिल १९८४ साली पुण्यातून सुरुवात केली. आजवर  देश विदेशात १५५० प्रयोग झाले असून प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आम्ही साधारण एका ठिकाणी ५ प्रयोग करतो. मात्र त्यामध्ये ठाण्यातील प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून १८ प्रयोग केले” असेही त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
share market akola
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray
“२५ वर्षांत मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिसरुड….”, देवेंद्र फडणवीसांची टीका

तसेच ते पुढे म्हणाले की, महानाट्यामध्ये १५० हून अधिक कलाकार हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध,सुरत छापा,शाहिस्तेखान छापा,आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील महानाट्य प्रयोगाचे निमंत्रण
राज्यासह देश विदेशात जाणता राजा महानाटयाचे प्रयोग झाले आहेत. या प्रयोगाला आत्तापर्यंत सामाजिक, राजकीय, कला आणि प्रशासकीय अधिकारी या मंडळीनी आजवर हजेरी लावली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील, यापूर्वी जाणता राजाचे प्रयोग पाहिले आहे. आता उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनादेखील या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असून तिसर्‍या किंवा चौथ्या दिवशी येण्याची शक्यता असल्याचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.

वेषभूषाकार जाणता राजा पुरस्कार विक्रम गायकवाड यांना जाहीर चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे वेषभूषा कार विक्रम गायकवाड यांना, पहिला जाणता राजा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.