News Flash

साताऱ्यातील कराडवाडीचे जवान सुभाष कराडे शहीद

देशसेवा करत असताना महाराष्ट्रातील जवान शहीद

जवान सुभाष कराडे यांचे छायाचित्र

साताऱ्यातील कराडवाडी (तालुका खंडाळा) येथील जवान सुभाष लाला कराडे हे अरूणाचल प्रदेशात देशसेवा बजावत असताना शहीद झाले. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर सगळे जवान तंबूत बसले होते. त्याचवेळी थंडीपासून ऊब देणाऱ्या बुखारीचा स्फोट झाला. यामुळे कराडे आणि इतर जवान बसलेल्या तंबूला आग लागली. या घटनेत कराडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जवान सुभाष कराडे यांच्या मृत्यूची बातमी साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.  सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी ही माहिती दिली.

कराडवाडी येथील जवान सुभाष कराडे हे २००१ मध्ये भारतीय सैन्य दलात सहभागी झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कराडवाडी आणि अंदोरी या ठिकाणी झाले. तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अंदोरी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण लोणंदमध्ये झाले. जवान सुभाष कराडे मागील १६ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. २०१६ मध्ये त्यांची भारतीय सैन्य दलातील सेवा संपली होती. मात्र त्यांनी आणखी दोन वर्षे देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय सैन्य दलात जवान सुभाष कराडे हे इंजिनिअरींग युनिट १२० ब्रिगेड ४६ मध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. अरूणाचल प्रदेशात त्यांचे पोस्टिंग होते. शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांचे पार्थिव गुवाहाटी येथून सैन्यदलाच्या विशेष विमानाने पुण्याला आणले जाणार असून त्यानंतर ते त्यांच्या गावाकडे रवाना होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 10:23 pm

Web Title: jawan subhash karade martyrs in arunachal pradesh
Next Stories
1 दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन पित्याची आत्महत्या
2 रस्त्यावर काय करावे हे नाना पाटेकरांनी शिकवू नये : राज ठाकरे
3 प्रा. वानखेडे हत्याप्रकरण: पत्नी, मुलीने दिली सुपारी, कॉल डिटेल्समुळे फुटले बिंग
Just Now!
X