28 February 2021

News Flash

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी दिली माहिती

संग्रहीत

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  व साहित्यिक  डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटन संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज(रविवार) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती.

या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे व जनार्दन वाघमारे ही नावं चर्चेत होती. अखेर डॉ. जयंत नारळीकर यांचं नाव निश्चित झालं आहे.

हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले होते. या वर्षी सार्वजनिक वाचनालय इच्छुक नसल्याचे कळल्यावर लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीतील मराठी जनांना मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून सरहद्द संस्थेने मागील वर्षी आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली होती. किमान यंदातरी आपला विचार होईल असे दिल्लीकरांना वाटत होते. संमेलन नाशिकला मिळतेय हे समजल्यावर सरहद्द संस्थेने महामंडळाला प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठविले होते. अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 4:22 pm

Web Title: jayant narlikar as the president of the 94th all india marathi literary conference msr 87
Next Stories
1 फिरण्यासाठी नवं ठिकाणं! पाचशे रुपयात व्याघ्र सफारी
2 बारामतीत बेरजेचं राजकारण! अजित पवार-शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील भेटीनंतर चर्चेला उधाण
3 आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय -शरद पवार
Just Now!
X