News Flash

जयंत पाटलांवरील संशयातूनच सांगली जिल्हा बँकेची चौकशी

नोटाबंदीनंतर सर्वच बँकांना जुन्या चलनातील रक्कम स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती.

जयंत पाटील

बँकेच्या अध्यक्षांचा आरोप

छगन भुजबळांनंतर आ. जयंत पाटील यांच्या संपत्तीबाबत संशय असल्यानेच जिल्हा बँकेची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली असल्याचा आरोप अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या मोर्चासमोर बोलताना केला. मात्र नाबार्ड, आयकर चौकशीमध्ये बँकेचे व्यवहार स्वच्छ असल्याचे आढळून आल्याने ईडीच्या हाती गर काहीही लागले नसल्याचे ते म्हणाले.

नोटाबंदीनंतर नाबार्ड, प्राप्तिकर आणि ईडीकडून चौकशी करण्यामागे आ. जयंत पाटील यांचा काळा पसा जिल्हा बँकेत पांढरा केला की काय, अशा संशय असावा, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चासमोर केला. या तिन्ही यंत्रणांना जिल्हा बँकेच्या व्यवहारात काहीही काळेबेरे आढळले नसून आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थ मंत्री अरूण जेटली यांच्याकडूनच चौकशी होणे उरले असल्याचेही ते म्हणाले. नोटाबंदीनंतर सर्वच बँकांना जुन्या चलनातील रक्कम स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. यामुळे पहिल्या चार दिवसात जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये १ लाख ४ हजार सभासद आणि ९१७ सहकारी संस्थांनी ३१५ कोटी रूपये जमा केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही रिझव्‍‌र्ह बँक हे पसे स्वीकारण्यास राजी नाही. जिल्हा बंॅकेच्या व्यवहारांची अगोदर ‘नाबार्ड’ने तपासणी केली. यानंतर प्राप्तिकर विभागाने विविध शाखांमध्ये जमा झालेल्या रकमांचीही तपासणी केली. मात्र या यंत्रणांना काहीही गर आढळून आलेले नाही. तरीही पुन्हा ईडीमार्फत (सक्त वसुली संचालनालय) चौकशी करण्यात आली. यामध्येही काहीही आढळून आलेले नाही. चौकशी करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांनी काहीही गर आढळले नसल्याचे सांगून खाजगीत मात्र शासनाच्याविरूध्द बोलू नका असा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्याविरूध्द ईडीने कारवाई करीत त्यांची तुरूंगात रवानगी केली. आता आ. जयंत पाटील यांच्याकडे काही सापडते का हे पाहण्यासाठीच जिल्हा बँकेची चौकशी करण्यात येत असल्याचा संशय आहे, असे सांगत पाटील या वेळी म्हणाले की, बँकेत एक पचाही अपहार अथवा गरव्यवहार झालेला नाही हे विविध तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:27 am

Web Title: jayant patil nad sangli district bank inquiry
Next Stories
1 एटापल्लीसह परिसरातील ७० गावांमध्ये खाणीविरोधात निषेधाचा नारा
2 सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार – अनिल पारस्कर
3 स्वातंत्र्यानंतरही आंबोली, चौकुळ, गेळेचा प्रश्न प्रलंबित
Just Now!
X