News Flash

…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल -जयंत पाटील

ट्वीट करून जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. (संग्रहित छायाचित्र)

‘मी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालो होतो’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशातील विधानांवर अजूनही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानामुळे मोदींचा दोन दिवसीय बांगलादेश दौराही चांगलाच चर्चेत राहिला. मात्र आता याचं विधानांवरून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला आहे.

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत आपण योगदान दिल्याचं म्हटलं होतं. या विधानावरून जयंत पाटील यांनी आता मोदी यांच्यावर निशाणा साधला. “आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले. त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली, तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असं म्हणत पाटील यांनी मोदींना चिमटा काढला आहे.

काय म्हणाले होते मोदी…?

“मी बांगलादेशातील बंधूभगिनी व येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं आंदोलन होतं. माझं वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.” असं मोदी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 3:35 pm

Web Title: jayant patil raised question about pm modis participation in bangladesh freedom movement bmh 90
Next Stories
1 शरद पवारांनी मानले उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे आभार
2 “आता तरी रहस्य कथेचा शेवट करा; काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे”
3 पवार-शाह भेटीची चर्चा; भाजपा आमदाराने फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर
Just Now!
X