राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातली तब्बल १८ वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली आहे. यात ते अमेरिकेतल्या हूवर धरणाजवळ उभे आहेत, असे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये जयंत पाटील म्हणतात, “२००२ साली एका कामानिमित्त अमेरिकेला गेलो असता तेथील जगप्रसिद्ध हूवर धरणाला भेट दिली होती. नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागात पाणी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण १९३६ साली बांधले गेले होते. तेव्हा हे विशाल धरण पाहून मोठा हेवा वाटला होता.”

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…


“योगायोगाने आज १८ वर्षांनंतर जलसंपदा मंत्री म्हणून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. अशाप्रकारचे विविध प्रकल्प राबवत आपल्या महाराष्ट्र राज्याला सिंचन क्षेत्रात प्रगतीशील बनवण्यासाठी मी कटीबद्ध राहीन.”