लोकसभेत समविचारी पक्षांना एकत्र घेवूनच काम केले जाणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली. माढामधून साहेबांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका सर्वच नेत्यांनी घेतली. पवार साहेबांनी याबाबतचा निर्णय घेतला नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांनीच साहेबांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका मांडली. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महत्त्वपुर्ण चर्चा झाली. पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वंचित आघाडीला चार जागा देण्याचे ठरवले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे असे वाटत आहे. संविधानाला जे विरोध करत आहेत त्या भाजपविरोधात प्रकाश आंबेडकर नक्की येतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विजयसिंह मोहिते पाटील,माजी मंत्री गणेश नाईक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार हेमंत टकले, मिडिया विभागाचे प्रमुख संजय घोडके आदी उपस्थित होते.